गणेश उत्सव सुरु होण्यापूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने आवाहन करूनही यंदा च्या गणेश उत्सव मिरवणुकांमध्ये आरोग्याला घातक अशा ‘डॉल्बी’ च्या दणदणाटाला आणि लेजर च्या घातक किरणांना नागरिकांना सामोरे जावे लागले. पण पोलीस प्रशासनाने आपले काम चोख पार पाडत सांगली आणि संजय नगर भागातील दहा मंडळांवर गुन्हे दाखल करून कायदा कोणी हातात घेऊन नये हे दाखवून दिले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश दिला असतानाही लेसर लाईट चा मारा या मंडळांया दहा मंडळांचे पदाधिकारी आणि लाईट मालक असे ३३ जणांवर संजयनगर आणि सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नेत्ररोग तज्ज्ञांच्या संघटनेने डोळ्यांना घातक ठरणाऱ्या या लेसर लाईट वर बंदी आणण्याबात जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी याना निवेदन दिले होते. जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी दि सप्टेंबर पासून मिरवणुकी मध्ये लेसर लाईट च्या वापरावर बंदी घातली होती. तरीही या मंडळांनी नवव्या दिवशी मिरवणुकी मध्ये लेसर लाईट चा वापर केला या मिरवणुकांचे व्हिडिओ चित्रण पोलिसांनी संकलित केले त्याप्रमाणे हि कारवाई करण्यात आली.
Discussion about this post