
कांडली खू येथील तरूण शेतकऱ्याची आत्महत्या..
मौजे कांडली खू ता. हिमायतनगर येथील तरूण शेतकरी शिवाजी परमेश्वर आंडगे वय वर्ष ३१ ह्यांनी सततच्या होत असलेल्या नापिकीमुळे झालेल्या कर्जबाजारीला व सतत होत असलेल्या अतीवृष्टिने शेतीमधील पिकाचे झालेल्या नूकसानीमूळे संपूर्ण परिवारावर कोसळलेले संकट उराशी बांधून विष प्राशन केले.
हि बातमी कळताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी व गावच्या सरपंचांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय हदगाव येथे घेऊन गेले असता उपचारादरम्यान तरूण शेतकरी शिवाजी परमेश्वर आंडगे यांचा मृत्यू झाला..
त्यांच्या पश्चात त्या शेतकऱ्यास पत्नी, एक मूलगा व एक मुलगी हि लहान बालके असून संकटात सापडलेल्या ह्या गरिब कूटूंबास शासनाने तत्काळ पंचनामा करून मदत मिळवून द्यावी अशी विनंती सरपंच विनायक पवार व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
Discussion about this post