पट्टेदार वाघाची परीसरात दहशत
वाघाच्या हल्लात ३ व्यक्ती गंभीर जखमी
भिसी:-आज दिनांक ४/०८/२०२४ ला कवडु मन्साराम सावसागडे वय वर्षे ५५ धंदा शेती रा.किटाळी असे असून हा व्यक्ती ठेक्याने शेती करीत होता आज दुपारच्या सुमारास वेळ १२:१५ वाजता गट क्रमांक ११५ विनय शेकर नन्नावरे यांच्या शेतात काम करीत असतांना अचानक वाघाने हल्ला करून जखमी केले.
बालाजी गणपत नन्नावरे वय वर्षे ५२ धंदा शेती रा. गरडापार हा व्यक्ती घटनेच्या वेळी खसरा क्रमांक १३५ येथे कामावर असतांना वाघाने हल्ला करून दुपारी वेळ १२:४५ च्या सुमारास जखमी केले.
बाबाराव दडमल वय वर्षे ४५ रा. ऊरकुडपार हा शेतकरी शेतात दुपारच्या सुमारास वेळ २:०० वाजता काम करण्याकरिता गेला असता अचानक वाघाने हल्ला करून जखमी केले. वाघाने जखमी केलेल्या तिन्ही व्यक्तींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले असून रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने रेफर करण्यात आले आहे. यावेळी वनविभागाची टिम रुग्णालयात दाखल झाली असून
सर्व चिमूर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Discussion about this post