• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

​जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार

by
February 3, 2026
in Blog, ताज्या घडामोडी, देश विदेश
0
​जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार
0
SHARES
69
VIEWS

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

Ad 1

जत शहरात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा पर्दाफाश; उपनगराध्यक्षांची तक्रार
प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला; दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विक्रम ताड यांची मागणी
जत (प्रतिनिधी):
जत शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन सुरू असून, यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, दोषींवर तातडीने फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रॉयल्टी न भरता हजारो ब्रासची चोरी
विक्रम ताड यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शहरात माती, दगड, मुरूम आणि वाळूचे बेकायदेशीर उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून आणि कोणतीही रॉयल्टी न भरता हजारो ब्रास गौण खनिजाची चोरी केली जात आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ६ मधील शेगाव रोडवरील सैनिक नगर परिसरात हे बेकायदेशीर काम राजरोसपणे सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान
शासनाच्या मालमत्तेची लूट करून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. या उत्खननामुळे रस्ते आणि नागरी सुविधांवरही परिणाम होत आहे. “शासनाची फसवणूक करणाऱ्या या माफियांची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्याकडून दंड वसूल करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत,” अशी ठाम मागणी विक्रम ताड यांनी केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या तक्रारीवेळी भाजप युवानेते किरण मामा शिंदे, भाजप नेते अविनाश सोनोले, अनिल पारसे, पिंटू स्वामी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या निवेदनाची प्रत सांगली येथील जिल्हा खणकर्म अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयालाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींनी थेट आक्रमक पवित्रा घेतल्याने आता प्रशासन या अवैध उत्खननावर काय कारवाई करणार, याकडे जतच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

रिसोड-प्रतिनिधि रिसोड शहरात ए स.टी महामंडळ नविन बस स्टैण्ड चे बाधंकाम चालु आहे लोणी फाटा वर प्रवासासाठी बैठक नाही तरि विद्यार्थी व नागरिकांचे हाल होतात बैठक सोय करावे असे नागरिक म्हणतात

Next Post

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले!पुणे जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ; वर्षभरात दर दुपटीने वाढले

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
160
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
29
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
39
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
10
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले!पुणे जिल्ह्यात रासायनिक खतांच्या किमतीत मोठी दरवाढ; वर्षभरात दर दुपटीने वाढले

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In