वणी – येथील ग्रामसेवा ग्रामीण शिक्षण मंडळद्वारा संचालित न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ दिनांक १३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थाध्यक्ष ॲड . अरुणजी बोबडे यांनी भूषविले . सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती सारीकाजी बोबडे, संचालक श्री. सचिनजी कूचनकर, मुख्याध्यापक प्रफुल महारतळे, सौ. रेखा गुरुनुले, सौ. श्रुतिका दखाने मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.आपल्या अध्यक्षीय भाषणाद्वारे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. अरुणजी बोबडे यांनी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त, कष्ट व वेळेचे नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन करीत येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी दहावीतील अश्मीरा पठाण, तमन्ना शेख, तृप्ती ढवस , श्रेया उईके, प्रभज्योत मट्टू , श्वेता कैतवास, आस्था जेणेकर, अंकिता घरोजा, निधी अर्जुनकर, अस्मिता प्रसाद, बिरेश जाना, मोहित उईके, आशुतोष खापणे, संमिश्र पोडे, अंशुल पोयाम, शंतनु नागरकर , युसुफ आलम इत्यादी विद्यार्थांनी मनोगत व्यक्त करीत भावूक शब्दांत शाळेतील आठवणीना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचालन निधी लडके , प्रास्ताविक दिगांत गुटके व आभार प्रदर्शन आर्यन पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता खुशी ब्राह्मणे, अलफिया अली, मानसी कुमारे, परिधी मुथा, अश्रुद्धा पेंदोर, आयुष सिडाम, आयुष जेणेकर, पार्श्व मुठा, पीयूष खिरटकर, रुद्रा चौधरी, सक्षम ढवस, यश चांदेकर, सुजैन जामा इत्यादी नववीचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





