नागभिड | प्रतिनिधी – आकाश गेडाम
नागभिड येथील मुसाभाई नगरमध्ये राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील वैष्णवी निलेश साळवे हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
वैष्णवीने प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेतून पूर्ण केले. पुढे शिक्षण घेत तिने डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, पुणे येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात ९.८६ सीजीपीए मिळवत टॉपर होण्याचा मान पटकावला.
साध्या परिस्थितीतून मोठी स्वप्ने पाहत शिक्षणाच्या बळावर तिने यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचाच नव्हे तर नागभिड शहराचाही अभिमान वाढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरणारी आहे.
वैष्णवीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.









