• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा…

by
February 14, 2026
in देश विदेश
0
प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा…
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

प्रेमाचा दिवस म्हणून 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा…

प्रतिनिधी :-दरिकांत कोळेकर.सारथी महाराष्ट्राचा न्युज.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

वृत्तसेवा:-कुरुंदवाड /फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा… प्रेमाचा आपुलकीचा सोहळाच असतो. हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून ओळखला जातो. १४ फेब्रुवारी रोजी शालेय, महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी व नागरिकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटवस्तू , गुलाब पुष्प, चॉकलेट, टेडी देऊन व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला.तर तरुणाईंनी मोबाईल, व्हाट्सअप, फेसबुकवर ग्रीटिंग पाठवून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या.

प्रेम एक अशी भावना जी व्यक्त होताना चेहरा खुलतो, बहरतो. तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची गरज नसते. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा आणि प्रणयाचा आंतरराष्ट्रीय उत्सव आहे. जो जगभरात प्रेमीयुगलाकडून एकमेकाबद्दलचे प्रेम,भक्ती आणि स्नेह साजरा केला जातो. या दिवशी प्रिय व्यक्तीला भेटवस्तू फुले आणि चॉकलेट दिले जाते. मैत्री व आपुलकी व्यक्त करण्याचा एक दिवस बनला आहे.

रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती. प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांचा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात ७ फेब्रुवारी रोज डेने होते या आठवड्यामध्ये प्रपोज डे, हग डे, चॉकलेट डे, प्रॉमिस डे साजरे केले जातात. तर १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साही वातावरणात सर्वत्र साजरा करण्यात येतो. गुलाबाच्या फुलांनी प्रेम व्यक्त करण्यापासून ते आयुष्यभरासाठी वचन देण्यापर्यंत आणि भावनिक नाते साजरे करण्यापर्यंत प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. व्हॅलेंटाईन डे रोमँटिक प्रेम आणि कौतुकाचा वार्षिक उत्सव आहे.

दरवर्षी येणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ला संस्मरणीय बनविण्यासाठी खास गिफ्टची तरुणाईकडून शोधाशोध सुरू होते. स्थानिक बाजारपेठेत गिफ्ट गॅलरी आणि मॉलमधील खरेदीला यंगस्टर्सनी प्राधान्य दिले होते. त्याच्या जोडीला ऑनलाइन बाजार ही यंगिस्तानच्या मदतीसाठी सज्ज झाली होती. खास वेबसाईट व्हॅलेंटाईनसाठी तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये आपल्या व्हॅलेंटाईनला काय गिफ्ट द्यायचे यापासून ते व्हॅलेंटाईन स्पेशल काय करू शकतो याबाबत नवीन कल्पना असे अनेक पर्याय उपलब्ध झाले होते.

शहरातील रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये ही लाल पांढऱ्या रंगाचे फुगे, फुले आणि पडद्यांचे आकर्षक सजावट करण्यात आली होती. काहींनी तर यंदाचा व्हॅलेंटाईन खास करण्यासाठी निसर्गरम्य परिसराची निवड केली होती. तर काहींनी कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यासाठी क्लासरूमही आकर्षक सजवण्यात आल्या होत्या. याशिवाय शहरात व्हॅलेंटाईनसाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

व्हाट्सअप, फेसबुकवरही ग्रीटिंग पाठवून व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कॉलेजमधील युवायुतीकडून व्हॅलेंटाईन डे चा माहोल सुरू झाला असल्याने गुलाब फुलापासून केक, चॉकलेट, टेडीबेअर, गिफ्ट वस्तूंच्या खरेदीसाठी गिफ्ट हाऊसेस, शॉपीमध्ये गर्दी झाली होती. आपल्या नात्यातील गोडवा अधिक दृढ निर्माण करण्याचे तसेच आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हृदयाच्या आकाराच्या चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्याचबरोबर हँडमेड, चॉकलेट, कँडी व केकची मागणी वाढली होती.

व्हॅलेंटाईन डे चा प्रारंभ ७ फेब्रुवारीपासून रोज डे नी झाली त्यामुळे गुलाब फुलांची मागणी वाढली होती. या गुलाब फुलांचा दर तेजीत असल्याने एका फुलाचा दर २५ ते ३० रुपये होता.

Previous Post

आश्रम शाळेतील मुलींची विमानाने ‘इस्रो ‘ची गगन भरारी..

Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभ

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In