• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

by
February 18, 2026
in Blog
0
महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक रविकांत सुतार सर तसेच आणासाहेब दिवटे सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे रविकांत सुतार यांनी विद्यार्थ्यांना यशाची “चतुरसूत्री” सांगितली. कठोर परिश्रम, सातत्य, आत्मविश्वास आणि स्पष्ट ध्येय ही यशाची चार महत्त्वाची सूत्रे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
आणासाहेब दिवटे यांनी विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेचे नाव उज्ज्वल ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. शाळेला कोणताही तडा जाऊ नये असे आपण वागणार आहोत, ही त्यांची भावना अभिमानास्पद आहे.” तसेच त्यांनी भावनिक होत सांगितले की, “मी आजपर्यंत जे शिकवले त्याचे समाधान मला या विद्यार्थ्यांकडून मिळाले.”

प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. दीपक कांबळे सर यांनी विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षेसाठी मार्गदर्शन करताना दहावीनंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधींची माहिती दिली. आपल्या आवडीनुसार व क्षमतेनुसार योग्य क्षेत्र निवडण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेविषयीच्या आपल्या आठवणी व अनुभव कथन करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला शिक्षक प्रताप देसाई, रविंद्र भोसले, राजाराम लोखंडे, संजीवनी खराडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम आनंद, प्रेरणा आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

RelatedPosts

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Previous Post

पाथरी येथे प्रा. डॉ. राजकुमार कांबळे यांचा ‘विद्या वाचस्पती’ सन्मान

Next Post

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Related Posts

Blog

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026
11
Blog

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांना १ लाखांचा अपघाती विमा

July 21, 2026
2
Blog

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व पेपरफुटीविरोधात शहाद्यात विविध संघटनांचे लाक्षणिक उपोषण; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

July 21, 2026
7
Blog

‘वाढदिवस नव्हे, समाजसेवेचा महोत्सव’! चंद्रकांत शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची तालुकाभर चर्चा

July 21, 2026
3
Blog

कडक उन्हामुळे खरीप पिके कोमेजली; अंबड तालुक्यात शेतकरी चिंतेत

July 21, 2026
4
Blog

कामातून विश्वास, विश्वासातून विकास; प्रभाग क्र. ७ मध्ये विकासकामांना वेग

July 21, 2026
32
Next Post

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांचा एल्गार; राजूभाऊ उंबरकर यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षक देण्याचे आश्वासन

July 21, 2026

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In