परभणी प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
पाथरी (जि. परभणी), दि. १३ फेब्रुवारी २०२६ : काशी हिंदी विद्यापीठ, वाराणसी यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘विद्या वाचस्पती’ (समतुल्य पीएचडी) या मानद उपाधीने सन्मानित झालेले प्रा. डॉ. राजकुमार विश्वनाथराव कांबळे (रा. पाथरी, जि. परभणी) यांचा आज श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संभाजी राजाराम बाविस्कर उपस्थित होते. तर प्राचार्य श्री. के. एन. डाहाळे यांच्या हस्ते प्रा. डॉ. कांबळे यांना प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रा. डॉ. कांबळे यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक तसेच सामाजिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे पाथरी तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.










