• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मदनापूर येथे ‘वन वणवा जनजागृती’ रॅली उत्साहात संपन्न

by
February 18, 2026
in Blog
0
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

​वनविभाग व स्थानिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने वणव्याचे दुष्परिणाम आणि उपाययोजनांबाबत प्रबोधन.

​राकेश शेरकी | तालुका प्रतिनिधी

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

​चिमूर (प्रतिनिधी):
उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलांना लागणाऱ्या वणव्यांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर, वन संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आणि वणव्याबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आज मदनापूर येथे भव्य ‘वन वणवा जनजागृती रॅली’ काढण्यात आली. वनपरिक्षेत्र पळसगाव अंतर्गत येणाऱ्या वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक मा. अमोलजी कवासे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.

​सदर रॅलीमध्ये जय लहरी जय मानव विद्यालय, मदनापूर आणि जि.प. उच्च प्राथमिक शाळा, मदनापूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी वणवा प्रतिबंधक घोषवाक्ये (स्लोगन) आणि जनजागृतीपर गीते गाऊन संपूर्ण मदनापूर गाव दणाणून सोडले. जंगलाला वणवा लावू नका, वन्यजीवांचे रक्षण करा, अशा घोषणा देत रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

​रॅलीचा समारोपीय कार्यक्रम जय लहरी जय मानव विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा. अमोलजी कवासे यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दांडेकर सर, बावनकर सर, वनरक्षक दाते साहेब, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक बनसोड सर, धुर्वे सर, दोडके मॅडम, वनरक्षक जरारे साहेब आणि वनरक्षक नागलोत साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन मा. कुशाब रोकडे सर यांनी केले.
​प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. दांडेकर सर, मुख्याध्यापक बनसोड सर, कवासे साहेब आणि निसर्ग पर्यटन मार्गदर्शक राकेश शेरकी यांनी वणव्याचे भीषण दुष्परिणाम विशद केले. वणव्यामुळे केवळ झाडेच जळत नाहीत, तर संपूर्ण जैवविविधता, लहान वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी नष्ट होतात, असे त्यांनी सांगितले. तसेच वणवा लागू नये म्हणून घ्यायची खबरदारी आणि तो लागल्यास करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.

​या कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, पर्यटन मार्गदर्शक, जिप्सी चालक-मालक आणि पी.आर.टी. चमू मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्यक्रमाचा समारोप मा. बावनकर सर यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने झाला.

Home » मदनापूर येथे ‘वन वणवा जनजागृती’ रॅली उत्साहात संपन्न
Home » मदनापूर येथे ‘वन वणवा जनजागृती’ रॅली उत्साहात संपन्न
Home » मदनापूर येथे ‘वन वणवा जनजागृती’ रॅली उत्साहात संपन्न
Home » मदनापूर येथे ‘वन वणवा जनजागृती’ रॅली उत्साहात संपन्न
Tags: राकेश शेरकी
Previous Post

अहमदनगर जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र 60% ने घटले तर ऊस पिकाचे क्षेत्र वाढले

Next Post

दर्यापूर तहसीलमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांना थेट वाचा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
दर्यापूर तहसीलमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांना थेट वाचा

दर्यापूर तहसीलमध्ये जनता दरबार; नागरिकांच्या समस्यांना थेट वाचा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In