• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टिटवाळा रिजन्सी संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साहपूर्ण उत्सव साजरा…

by
February 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
टिटवाळा रिजन्सी संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साहपूर्ण उत्सव साजरा…
0
SHARES
22
VIEWS
Ad 1
Ad 1

टिटवाळा रिजन्सी संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साहपूर्ण उत्सव साजरा…

टिटवाळा (कल्याण):प्रफुल्ल शेवाळे

RelatedPosts

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

दिवाळीचा फटाका…

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

टिटवाळा, २० फेब्रुवारी २०२६: टिटवाळा येथील रिजन्सी संकुल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६व्या शिवजयंतीनिमित्त आज भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संकुलातील रहिवासी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन शिवरायांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला.
सकाळी लवकर सुरू झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, आरती आणि पारंपरिक पाळणा सोहळा घेण्यात आला. संकुलातील बालकांनी शिवगीते, पोवाडे आणि भजने सादर करून वातावरण शिवमय केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्थानिक शिवप्रेमी कलाकार विशाल सदाफुले यांनी महाराजांची छबी अतिशय सुंदरतेने साकारली होती. सकाळच्या सत्रात पार पडलेल्या रॅली मध्ये लहान मुले, महिला वर्ग आणि नागरिक शिवरायांना मुजरा करत नतमस्तक होताना दिसत होते.

संकुलाच्या व्यवस्थापन समितीने सांगितले की, “शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याचे तत्त्वज्ञान आजही आम्हाला प्रेरणा देतात. या उत्सवातून आम्ही युवा पिढीला महाराजांच्या आदर्शांचे महत्त्व समजावून सांगतो.” कार्यक्रमात पारंपरिक लेझिम नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जयंती व्यवस्थापन समितीकडून प्रसादाचे वाटपही करण्यात आले.
संध्याकाळी झालेल्या शिवराज्यभिषेक या सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी शिवचरित्रावर आधारित छोटे नाट्य तसेच शिवकालीन गाणी सादर करण्यात आली. उत्सवात सहभागी झालेल्या रहिवाशांनी सांगितले की, “रिजन्सी संकुलात अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम नियमित होतात, पण शिवजयंतीचा उत्सव खास असतो. यंदा सर्वांनी खूप उत्साह दाखवला.”

टिटवाळा शहरातच नव्हे तर परिसरातील अनेक सोसायट्या आणि मंडळांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी होत असून, रिजन्सी संकुलातील हा उत्सव स्थानिक पातळीवर एक आदर्श ठरला आहे.


महाराष्ट्र पोलीस दलाने संपूर्ण कार्यक्रम करिता चोख बंदोबस्त ठेवत आपली कामगिरी पार पाडली. यावेळी कल्याण तालुका पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी जनतेला शिवजयंती च्या शुभेच्छा देत स्वतः संपूर्ण सोहळ्यामध्ये जातीने लक्ष दिले असल्याचे पहायला मिळाले.

Ad 1
Previous Post

अब तक 62 | सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्यांची यादी..! एकूण दहा स्वीकृत नगरसेवक असणार..! नऊ भाजपाचे तर एक एम आय एम चा.Solapur Municipal Corporation, Solapur

Next Post

देवलगाव (आ ) ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

Related Posts

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!
ताज्या घडामोडी

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026
10
ताज्या घडामोडी

दिवाळीचा फटाका…

November 5, 2026
31
चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!
ताज्या घडामोडी

चिमुकल्याच्या न्यायासाठी चिमुकल्याचीच धडपड; हातात मोबाईल घेत बनला बालपत्रकार!

November 5, 2026
27
ताज्या घडामोडी

‘आयडॉल शिक्षक’ निवडीत उमरखेडची बाजी; तालुक्यातील तब्बल २८ शिक्षकांचा समावेश!

November 5, 2026
13
संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!
ताज्या घडामोडी

संपूर्ण विश्वाला स्वर्ग बनविण्यासाठी जैन धर्माची अनोखी पहल!

November 3, 2026
16
मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा
ताज्या घडामोडी

मेळजानोरीतील रेशन दुकानदाराच्या मनमानी कारभाराविरोधात महिलांना दिलासा

November 3, 2026
25
Next Post
देवलगाव (आ ) ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

देवलगाव (आ ) ग्रामपंचायतमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

ताज्या बातम्या

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

भारतीय ज्ञानपीठ शाळेत कृतज्ञता व आभार सोहळा उत्साहात संपन्न!

November 5, 2026
जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन!

November 5, 2026
तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

तहसीलपासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा; अखेर श्रीगोंदा रेशन प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश

November 5, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In