• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम; वडिलांचे निधन असतानाही दिला दहावीचा पेपर

by
February 21, 2026
in Blog
0
धनश्री पवारच्या जिद्दीला सलाम; वडिलांचे निधन असतानाही दिला दहावीचा पेपर
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

सोलापूर (प्रतिनिधी):
दहावीचा पहिला मराठीचा पेपर आणि त्याच दिवशी वडिलांचे दुःखद निधन… अशा अत्यंत वेदनादायी प्रसंगातही मनोबल न ढळू देता परीक्षा देणाऱ्या धनश्री पवार हिच्या जिद्दीला सर्वत्र सलाम केला जात आहे. सोलापूर येथील शरदचंद्र पवार प्रशाला या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकणारी धनश्री भिकाजी पवार हिच्या आयुष्यातील हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक ठरला.

शुक्रवारी सकाळी तिच्या वडिलांचे, भिकाजी पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरात शोककळा पसरली. नातेवाईक आणि शेजारी अंत्यविधीसाठी जमू लागले. त्याच दिवशी धनश्रीचा मराठीचा पहिला पेपर होता. तिच्या वडिलांनी तिच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या. त्यामुळे हा पेपर बुडू नये, अशी सर्वांची इच्छा होती.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत स्वतः धनश्रीच्या घरी भेट दिली. त्यांनी कुटुंबीयांना समजावून सांगत अंत्यविधीची वेळ दोन तास पुढे ढकलण्याची विनंती केली. कुटुंबीयांनीही शिक्षणाच्या महत्त्वाला प्राधान्य देत सकारात्मक निर्णय घेतला. मुख्याध्यापकांनी धनश्रीला धीर देत तिला स्वतः परीक्षा केंद्रावर नेले.

तीन तास पूर्ण बसणे धनश्रीसाठी शक्य नव्हते. त्यामुळे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. त्यांनीही संवेदनशीलतेने निर्णय घेत केंद्रप्रमुख श्रीमती गीता सादुल यांना धनश्रीला अर्ध्या वेळेत परीक्षा संपवण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले. स्वतः शिक्षणाधिकारी केंद्रावर येऊन धनश्रीला धीर देत तिचे मनोबल वाढवले.

धनश्रीने दीड तासात आपला पेपर पूर्ण केला. त्यानंतर मुख्याध्यापक तानाजी माने यांनी संतोष लोंढे या सेवकाच्या वाहनाने तिला परत अंत्यविधीसाठी घरी आणले. एवढ्या मोठ्या दुःखातही शिक्षणाप्रती असलेली तिची निष्ठा आणि जिद्द पाहून उपस्थित नातेवाईक, शिक्षक, शाळा प्रशासन आणि परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.

धनश्री पवार हिच्या या धैर्यपूर्ण कृतीने शिक्षणाचे महत्त्व आणि संकटसमयीही न ढळणारे मनोबल याचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous Post

पारेवाडीत शिवव्याख्यात्या प्रतिक्षाताई तवले पाटिल यांचे प्रेरणादायी शिवचरित्रपर व्याख्यान…

Next Post

सोलापूर:- सहाय्यक आयुक्त खंदारे यांना निलंबित करा|संभाजी ब्रिगेड

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
20
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
31
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
30
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
15
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
41
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
7
Next Post

सोलापूर:- सहाय्यक आयुक्त खंदारे यांना निलंबित करा|संभाजी ब्रिगेड

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन : ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा उत्सव*

October 4, 2026
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In