• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरकुंभमध्ये थरार! जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; पिकअपची धडक देऊन कोयत्याने सपासप वार

by
February 21, 2026
in Blog
0
0
SHARES
143
VIEWS
Ad 1

कुरकुंभमध्ये थरार! जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; पिकअपची धडक देऊन कोयत्याने सपासप वार

विशेष प्रतिनिधी: रोहित जगताप (सारथी महाराष्ट्राचा)

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कुरकुंभ (दौंड):
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील मुकादमवाडी पुलावर शुक्रवारी रात्री एका तरुणाची चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय २९, रा. पाटस) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:१५ च्या सुमारास फिर्यादी महेश मारुती टुले, मृत महेश भागवत, युवराज शिंदे आणि राज होले हे दुचाकीवरून पाटसच्या दिशेने जात होते. सोलापूर-पुणे हायवेवरील मुकादमवाडी पुलावर आले असता, आरोपींनी त्यांना पाठीमागून पिकअप गाडीने जोराची धडक दिली. या धडकेत सर्वजण खाली पडल्यानंतर आरोपींनी महेश भागवत याच्यावर कोयता आणि सत्तूरने सपासप वार करून त्याला जागीच ठार मारले.
पाच जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी महेश मारुती टुले (वय २५, रा. तामखडा पाटस) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे:
१) संतोष शितकल
२) आनंद माकर
३) विकी शितकल
तसेच त्यांच्या इतर दोन अनोळखी साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
खुनाचा बदला खुनाने?
परिसरात अशी चर्चा आहे की, मृत महेश भागवत हा मागील एका खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार होता. त्याच खुनाचा बदला घेण्यासाठी संतोष शितकल आणि त्याच्या साथीदारांनी हा कट रचून त्याचा काटा काढल्याचे बोलले जात आहे.
या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करत आहेत. भररस्त्यात झालेल्या या हत्याकांडामुळे पाटस आणि कुरकुंभ परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

रिपोर्ट: रोहित जगताप, सारथी महाराष्ट्राचा

Previous Post

सोलापुरातील होटगी रोड येथील इंडस्ट्रियल इस्टेट सोसायटीमध्ये 24 फेब्रुवारी रोजी होणार उद्योग योजनांच्या माहितीसाठी कार्यशाळा..

Next Post

रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

रामटेक बसस्थानक बांधकामात अनियमिततेचा आरोप:राष्ट्रवादीचे रामटेक तालुका अध्यक्ष मनीष खोब्रागडे यांचे आगार प्रमुखांना निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In