• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू

by
February 21, 2026
in प्रशासन
0
‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाचा पहिला टप्पा राज्यात सुरू
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

रायगड-पनवेल,(ता.प्रतिनिधी):-* राज्यातील सामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आणि तक्रारी सत्वर निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हयातील तालुक्यातील मंडळ स्तरावर या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत पूर्व तयारी करण्यात येणार असून, प्रत्यक्ष शिबिरांची सुरुवात ७ मार्चपासून होणार आहे. या विशेष मोहिमेद्वारे नागरिकांना एकाच दिवशी सेवा (Single Day Service Delivery) पुरविण्यावर आणि महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करताना रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी समस्त रायगडकरांना या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

RelatedPosts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

अभियानाच्या वेळापत्रकानुसार, मार्च महिन्यात ७ आणि १४ तारखेला मंडळ स्तरावर शिबिरे होतील. त्यानंतर एप्रिल महिन्यात १० आणि १७ तारखेला पुन्हा मंडळ स्तरावर आयोजन करण्यात येईल, तर मे महिन्यात ८ आणि १५ तारखेला नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर ही शिबिरे घेतली जातील.

या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार निकाली काढणे, ७/१२ मधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष हेल्प डेस्क उपलब्ध करून देणे आणि उत्पन्न, अधिवास व जातीच्या दाखल्यांचे वाटप करणे अशा महत्त्वाच्या सेवा पुरविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, अकृषिक (NA) रूपांतरणासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नसून, विकास आराखडा मंजुरी हीच परवानगी समजली जाईल, यासारख्या नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंबंधी बदलांची माहितीही या शिबिरात दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त, जमिनीच्या तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची सोपी व्यवस्था आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ उताऱ्यांची कायदेशीर वैधता यांबाबत नागरिकांचे प्रबोधन केले जाईल. भूसंपादन झालेल्या जमिनींचे कमी-जास्त पत्रक तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कार्यवाही देखील याच कालावधीत पूर्ण केली जाणार आहे. ‘एक खिडकी योजना’ राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील आणि लोकांचे प्रश्न तातडीने सोडवतील, याची दक्षता घेण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

Tags: Shrinath Laad
Previous Post

रुद्रम प्रोॲक्टिव्ह अबॅकसतर्फे “गणिताची भीती दूर करूया.-संध्याताई जाधव.

Next Post

वाळूज एमआयडीसी परिसरात तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना

Related Posts

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू
Blog

Highwa Truck चालकांचा मजूर पना सामान्य नागरिकांचा मृत्यू

March 18, 2026
8
पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके
प्रशासन

पुरवठा विभागामार्फत 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन; जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फ़ुलूके

March 11, 2026
3
आरोग्य

📰 छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन भक्तिमय वातावरणात साजरा

March 11, 2026
24
पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…
Blog

पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच नामनिर्देशित सदस्यांची निवड…

March 6, 2026
56
अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद
*कोकण*

अर्थसंकल्पातील ऐतिहासिक घोषणा : महानुभाव पंथीय स्थानांच्या संवर्धनासाठी शासनाची मोठी तरतूद

March 6, 2026
46
महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन
प्रशासन

महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेत बचत गटांच्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन

March 5, 2026
78
Next Post

वाळूज एमआयडीसी परिसरात तरुणीच्या हत्येची धक्कादायक घटना

ताज्या बातम्या

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026

पातुर तालुक्यात उष्णतेचा कहर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In