• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात

by
February 22, 2026
in Blog
0
दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

दापोली | दि. १९ (प्रतिनिधी)दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या आडे गावात शिवभक्त मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नारळी-पोफळीच्या हिरव्यागार बागांनी नटलेल्या आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेल्या या गावात शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.

गेल्या सहा वर्षांपासून गावातील तरुण पिढीच्या पुढाकारातून शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले जात असून, यंदाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सकाळी १० वाजता शिवरायांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. दुपारी १२ वाजता मंत्रोच्चारात पूजा व आरती संपन्न झाली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित प्रभावी भाषणे सादर केली.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

दुपारी ३ वाजता ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगव्या पताकांनी सजलेले गाव आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण शिवमय झाले होते. उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवभक्त मंडळाचे अध्यक्ष सोहम परकर, उपाध्यक्ष पार्थ मुरुडकर, सचिव सुरज खोत व रोहित खातू, खजिनदार अमित मुरुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री राम मंडळ व श्री राम महिला मंडळ, आडे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

समुद्रकिनारी निसर्गरम्य वातावरणात साजरा झालेला हा शिवजन्मोत्सव सामाजिक ऐक्य, संस्कृती जतन आणि तरुणांच्या एकजुटीचे प्रतीक ठरला.

दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात

Tags: प्रतिनिधी:राकेश.चिलबे.
Previous Post

सेवा भावाची परंपरा कायम,डॉ.इनामदार यांची पत्रकरांसाठी मोफत तपासणी.

Next Post

पंचायत समितीत सभापती पदासाठी माळशिरस मध्ये भाजप चे लॉबिंग

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post
पंचायत समितीत सभापती पदासाठी माळशिरस मध्ये भाजप चे लॉबिंग

पंचायत समितीत सभापती पदासाठी माळशिरस मध्ये भाजप चे लॉबिंग

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In