• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खडकवाडी(लोणी)–सविंदणे मार्गावर मोराचा दुर्दैवी अंत

by
February 25, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी – तेजस वाळुंज

ता. आंबेगाव तालुक्यातील लोणी गाव हद्दीत खडकवाडी–सविंदणे रस्त्यालगत चिमटा वस्ती जवळील ओढ्याच्या काठावर तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय पक्षी मोर मृतावस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून वन्यजीवांच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल रामदास सिनलकर हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे जात असताना शेताच्या कडेला असलेल्या ओढ्यात त्यांना मोर पडलेल्या अवस्थेत दिसला. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधत वनरक्षक योगेश निघोट यांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत मोर ताब्यात घेतला. पुढील तपासणीसाठी मृतदेह निरगुडसर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल तळेकर यांनी शवविच्छेदन केले असता मोराच्या पोटात प्लास्टिकचे तुकडे तसेच लोखंडी तारेचे अवशेष आढळून आले. या घातक वस्तूंचे सेवन झाल्यानेच मोराचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने संबंधित घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मृत मोराचे अवसरी वनउद्यानात शासकीय नियमांनुसार दहन करण्यात आल्याची माहिती वनरक्षक योगेश निघोट यांनी दिली. सध्या लोणी व धामणी परिसरातील ओढे-नाले कोरडे पडू लागले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाण्याअभावी वन्य प्राणी व पक्षी अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कचरा, प्लास्टिक किंवा इतर घातक वस्तूंच्या संपर्कात येऊन वन्यजीवांचे जीवित धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाने लोणी-धामणी परिसरात तातडीने पाणवठ्यांची व्यवस्था करावी, तसेच धान्य व सुरक्षित खाद्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. यासोबतच नागरिकांनीही परिसरात प्लास्टिक व घातक कचरा टाकणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे वन्यजीव संवर्धनासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Previous Post

हलकर्णी-वाटंगी मार्गावरील ‘वटवृक्ष’ वाचवा, अन्यथा तीव्र आंदोलन!

Next Post

जिल्हा परिषद शाळा लोणी मध्ये रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘व्यवहारज्ञानाचा’ उत्सव

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
9
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

जिल्हा परिषद शाळा लोणी मध्ये रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘व्यवहारज्ञानाचा’ उत्सव

ताज्या बातम्या

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026
दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

दत्तनगर येथे मारहाणी प्रकरणी माहूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In