• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद शाळा लोणी मध्ये रंगला बाल आनंद मेळावा; विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘व्यवहारज्ञानाचा’ उत्सव

by
February 25, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

लोणी प्रतिनिधी – तेजस वाळुंज

ता. आंबेगाव येथील लोणी गावातील जिल्हा परिषद शाळा लोणी परिसरात आयोजित करण्यात आलेला ‘बाल आनंद मेळावा’ उत्साह, चैतन्य आणि नवउमेद यांचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्याला पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. शाळेच्या आवारात दिवसभर लहानग्यांची लगबग, स्टॉल्सवरील गर्दी आणि आनंदी वातावरण पाहायला मिळाले. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः नियोजन करून विविध प्रकारचे स्टॉल्स उभारले होते. ‘खाऊ गल्ली’, ‘बाजार स्टॉल’ तसेच घरगुती खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. भाजीपाला, फळभाज्या, दक्षिणात्य खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ, विविध प्रकारची चॉकलेट्स तसेच संतुलित आहारातील पदार्थ विक्रीस ठेवण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनी ग्राहकांशी संवाद साधत विक्री, पैशांची देवाणघेवाण, हिशेब नोंदणी अशी कामे आत्मविश्वासाने पार पाडली. यावेळी शिक्षिका मोटे मॅडम यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुस्तकी शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवातून शिकणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” त्यांच्या या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास लोणी गावचे लोकनियुक्त सरपंच डॉ. साळगाव नाईक, माजी उपसरपंच शिवाजीराव गायकवाड, समाजभूषण कैलासराव गायकवाड, ग्रामपंचायतचे माजी सदस्य रवींद्र रोकडे, राहुल भागवत, विशाल वाळुंज, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अधिकारी वैभव लंके, दिगंबर तात्या सोनवणे, शिक्षण समितीचे अध्यक्ष गौरव रोकडे, उपाध्यक्ष सोनाली खंडागळे तसेच बळशीराम वाळुंज, निर्मला कदम, मंगेश थोरात, कांचन गायकवाड, योगेश वाळुंज, अस्मिता जाधव, सोमनाथ वाळुंज, वर्षा आढाव, यशवंत वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री भैरवनाथ विद्याधाम शाळेचे प्राचार्य ढगे सर, तांबोळी सर आणि इतर ग्रामस्थांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. शाळेचे मुख्याध्यापक मोबीन मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कदम सर, चौधरी सर, मोटे मॅडम व इतर शिक्षक सहकाऱ्यांनी या मेळाव्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. बाल आनंद मेळावा हा केवळ खरेदी-विक्रीचा उपक्रम नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना बळकट होत असून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारीही घडत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Previous Post

खडकवाडी(लोणी)–सविंदणे मार्गावर मोराचा दुर्दैवी अंत

Next Post

अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक मातीमोल

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

अवकाळी पावसामुळे गव्हाचे पिक मातीमोल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In