• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मराठी हीच आपली खरी ओळख आणि संस्कृतीची जननी – प्रा. दिलीप संकपाळ

by
February 27, 2026
in Blog
0
मराठी हीच आपली खरी ओळख आणि संस्कृतीची जननी – प्रा. दिलीप संकपाळ
0
SHARES
41
VIEWS
Ad 1

आजरा महाविद्यालयात ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा; ग्रंथ प्रदर्शन व स्वाक्षरी मोहिमेला उस्फूर्त प्रतिसाद
​आजरा: प्रतिनिधी
“आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी भाषेची आवश्यकता असली, तरी मराठी भाषा हीच आपली खरी अस्मिता आणि संस्कृतीची जननी आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठीसारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे मराठी हीच आपली खरी ओळख बनली पाहिजे,” असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ यांनी केले.
​येथील आजरा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.
​विविध उपक्रमांनी मराठीचा जागर
​दिवासाचे औचित्य साधून महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन आणि ‘मराठी स्वाक्षरी मोहीम’ राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर डॉ. आप्पासो बुडके यांनी उपस्थित सर्वांना ‘मराठी भाषा संवर्धन शपथ’ दिली.
​व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा व्हावी
​आपल्या व्याख्यानात प्रा. संकपाळ पुढे म्हणाले की, “मराठी केवळ घरापुरती मर्यादित न ठेवता ती व्यवहाराची आणि तंत्रज्ञानाची भाषा बनली पाहिजे. तरुण पिढीने वाचन संस्कृती जोपासायला हवी, तरच मराठी भाषेचे भविष्य अधिक उज्वल होईल.”
​विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग
​यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे बहारदार वाचन केले. यामध्ये:
​अथर्व मोहिते, संचिता तरडेकर, श्रेया लटके, क्षितिजा ढोकरे, सानिका पन्हाळकर, अक्षरा कांबळे आणि सानिका गुंजाळ यांचा समावेश होता.
​श्रुती कांबळे हिने ‘अभिमान माय मराठीचा’ या विषयावर अत्यंत प्रभावी भाषण केले. तिच्या या कौशल्याबद्दल प्राचार्य डॉ. सादळे यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

​मान्यवरांची उपस्थिती
​याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, प्रा. विनायक चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. मनोज पाटील, अधीक्षक योगेश पाटील, ग्रंथपाल प्रा. रवींद्र आजगेकर, प्रा. योगिता भोकरे, प्रा. सुषमा नलावडे, प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे, डॉ. अविनाश वर्धन यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैशाली देसाई यांनी केले. सूत्रसंचालन निदा इंचनाळकर हिने केले, तर समृद्धी कालेकर हिने सर्वांचे आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Previous Post

व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा येथे ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ विषयावर व्याख्यान संपन्न!

Next Post

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
5
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
46
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
10
Next Post

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In