तालुका प्रतिनिधी राजकुमार पांचाळ 9657978196

दि. 27 सप्टें. भोकर तालुक्यातील रेणापूर गावात ग्रामसेवक व ग्रामपंचायतीकडून झालेल्या 28 लाखाच्या अपहाराची ग्रामस्थरावर जनतेसमक्ष चौकशी करण्याबाबद बहुजन समाज पार्टी जिल्हाध्यक्ष (युवा सेल) तथा रेणापुर गावचे सामाजिक युवा कार्यकर्ते श्री नागोराव बिरगाळे यांनी नांदेड जिल्हापरिषदेचे कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवल यांच्याकडे तक्रार व विनंती केली. यावेळी गावकऱ्यांसह बहूजन समाज पार्टीचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
काही दिवसापुर्वी रेणापूर येथिल ग्रामसेवक आणि काही ग्रामपंचायत सदस्यांच्या संगनमतातून विविध विकास कामाच्या नावाखाली कोणतीच ग्रामसभा न घेता एककलमी कार्यक्रम राबवून आणि बंदुक नाममात्र असलेल्या सरपंचाच्या खांद्यावर ठेऊन 28 लाखाचा अपहार झाल्याचे एक सुज्ञ ग्रामपंचायत सदस्य असलेले डॉ. कैलास कानिंदे यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यामध्ये सरकारी योजनेसोबतच गावकऱ्यांनी पाणीफाऊंडेशनची योजना राबवून श्रमदान करून, घाम गाळून गावाला तालुक्यातून तिसरा क्रमांक व सहा लाख रूपये ईनाम मिळवून दिला होता. त्यापैकी प्रत्यक्ष फक्त एक-दिड लाखाचे काम करून बाकी निधी सुध्दा हडप करण्यात आला होता. 50% पेक्षा जास्त कामे तर कागदावरच केलेली दिसून आली होती. त्यावेळी ग्रामसेवक आणि साथ देणाऱ्या त्या सदस्यांची चौकशी करण्याचे आदेश ग्राम विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून देण्यात आले होते. त्यानुसार चौकशीसाठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांने गावकऱ्यांसमक्ष चौकशीही केली होती. त्या चौकशीला सरपंचासह अपहारात सामील असलेला एकही सदस्य हजर नव्हता. फक्त ग्रामसेवकाच्या झालेल्या या प्रत्यक्ष चौकशीत जी माहीती समोर आली तो अहवालात मात्र त्या चौकशी अधिकाऱ्याकडून हेतुपुरस्सर लपवण्यात आला. आणि 80% खोटा अहवाल पंचायतसमितीला सोपवण्यात आला. त्यामुळे जनतेला पंचायत समितीपर्यंत मिलीभगत दिसून आली. त्यामुळे अखेर गावातील विविध विकास कामात सरपंच व ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार घेऊन बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक युवा कार्यकर्ते नागोराव बिरगाळे यांना आपली तक्रार घेऊन जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवल यांच्या दालनाकडे धाव घ्यावी लागली. भेटीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सखोल माहिती देण्यात आली. या सर्व अपहाराची सखोल चौकशी ही गावातील गावकऱ्यांपुढे करावी व दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करून तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंतीही केली. अश्या अनेक प्रकारच्या वास्तविक तक्रारी करण्यात आल्या व आपल्या कडूनही योग्य न्याय मिळेत नसेल तर जिल्हा परिषदे समोर उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला.
Discussion about this post