• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान.

by
March 10, 2026
in Blog
0
कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान.
0
SHARES
9
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी –

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण व अभूतपूर्व परिस्थितीत संपूर्ण देशासह लातूर जिल्ह्यात देखील पोलीस दलाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कर्तव्य बजावले. कोरोना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणावर असतानाही पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोणतीही भीती न बाळगता रस्त्यावर उतरून नागरिकांचे संरक्षण, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी, जमावबंदीचे पालन तसेच अत्यावश्यक सेवांचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

RelatedPosts

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

या कालावधीत नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य बजावत असताना लातूर पोलीस दलातील पोलीस अमलदार राजकुमार शिवाजी लोखंडे यांना कोरोनाची लागण होऊन दिनांक २१/११/२०२० रोजी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आपल्या कर्तव्यनिष्ठा, समर्पण व समाजसेवेच्या भावनेतून त्यांनी दिलेले हे बलिदान पोलीस दलासाठी तसेच समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने आज रोजी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या हस्ते संबंधित मयत पोलीस अमलदारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

यावेळी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मयत पोलीस अमलदारांच्या संदर्भातील सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक यांनी यावेळी व्यक्त केले की, अशा कठीण प्रसंगी पोलीस विभाग संबंधित कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शासनाकडून मिळालेल्या या आर्थिक मदतीमुळे कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तसेच त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक आधार मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लातूर पोलीस दल आपल्या कर्तव्यनिष्ठ सहकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सदैव उभे आहे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

चंदगड पंचायत समितीवर राष्ट्रवादीची मोहोर; सभापतीपदी विलास नाईक तर उपसभापतीपदी संज्योती मळविकर यांची निवड

Next Post

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

Related Posts

Blog

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
0
भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Blog

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहराध्यक्षांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 2, 2026
10
निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न
Blog

निमसोड सिद्धनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे एन.एम.एस. परीक्षेत यश; सत्कार समारंभ संपन्न

May 2, 2026
2
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक
Blog

शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक

May 2, 2026
1
Blog

चिंचणी (अं.) येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये रविवारी माजी विद्यार्थी मेळावा

May 2, 2026
29
आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न
Blog

आधार अपडेट कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना दिलासा; बोरगव्हान शाळेत उपक्रम उत्साहात संपन्न

May 2, 2026
3
Next Post
जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

जि प प्रा केंद्रशाळा सापटणे (भो) येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In