• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलच्या तीन खेळाडूंची कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघात निवड

by
March 18, 2026
in Blog
0
आजरा हायस्कूलच्या तीन खेळाडूंची कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघात निवड
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

विभागीय स्पर्धेसाठी सज्ज; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

​आजरा: (आमच्या प्रतिनिधीकडून)
कोल्हापूर पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनमार्फत आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणीत आजरा येथील ‘जनता एज्युकेशन सोसायटी’ संचालित आजरा हायस्कूलच्या तीन खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. या खेळाडूंची कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघात निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​उत्कृष्ट खेळाच्या जोरावर स्थान निश्चित
१४ वर्षांखालील वयोगटासाठी ही निवड चाचणी पार पडली. यामध्ये आजरा हायस्कूलच्या कु. श्रावणी इलगे, कु. निधी मोरबाळे आणि कु. मनिष पेंडसे या तीन खेळाडूंनी आपल्या अष्टपैलू आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर जिल्हा संघात आपले स्थान पक्के केले. हे तिन्ही खेळाडू आता आगामी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
​मार्गदर्शन आणि प्रोत्साहन
या यशस्वी खेळाडूंना शाळेतील क्रीडाशिक्षिका सौ. एम. पी. चव्हाण आणि श्री. एम. ए. गोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर, उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत आणि पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी यांनी खेळाडूंचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले.
​या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेतील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडीमुळे संपूर्ण आजरा परिसरातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

Previous Post

Как анализировать свою историю ставок на Mostbet

Next Post

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
33
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

रस्त्याच्या दुरावस्थेबाबत निलेश कापकर यांच्या तक्रारीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल!

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In