• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खंडणीला विरोध केल्याने महिला व्यावसायिकेला बेदम मारहाण; श्रीगोंद्यात संताप, गावबंदाबाबत आज बैठक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
106
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा प्रतिनिधी 🖊️

श्रीगोंदा शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्यानासमोर २१ मार्च रोजी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे एका महिला व्यावसायिकेला लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम दिनेश शिंदे या “भरकादेवी आयस्क्रीम” या त्यांच्या दुकानावर एकट्याच होत्या. त्या वेळी त्यांच्या पती शेख महंमद हे रमजान ईदनिमित्त महंमद महाराज मंदिर येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत आरोपी बाहुल्या गुलाब काळे हा इसम तेथे आला. त्याच्यासोबत त्याची आई संगीता काळे, पत्नी तसेच दोन अनोळखी महिला देखील होत्या.

आरोपींनी शिंदे यांना “ही जागा माझ्या ताब्यात आहे, येथे दुकान लावायचे असल्यास दरमहा ५० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करत धमकावले. यावर शिंदे यांनी संबंधित जागा ही श्रीगोंदा नगरपरिषदेची असल्याचे सांगत खंडणी देण्यास नकार दिला.

या नकारामुळे संतप्त झालेल्या बाहुल्या काळे याने हातातील लोखंडी गजाने शिंदे यांच्या हातावर, पाठीवर व कंबरेवर मारहाण करून त्यांना जखमी केले. त्यानंतर त्याची आई, पत्नी व इतर महिलांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिंदे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना या मारहाणीतून वाचवले.

घटनेनंतरही आरोपींनी “पन्नास हजार रुपये दिले नाहीत तर येथे दुकान लावू देणार नाही, तसेच तुला आणि तुझ्या नवऱ्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पूनम शिंदे यांच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात बाहुल्या गुलाब काळे, संगीता काळे, त्यांची पत्नी व दोन अनोळखी महिलांविरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामस्थांमध्ये संताप; गावबंदाबाबत बैठक

या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा मोठ्या संख्येने नागरिक श्रीगोंदा पोलिस ठाण्याबाहेर जमले होते. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या भागातील काही व्यक्तींमुळे नागरिकांना वारंवार त्रास होत असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर आज श्रीगोंदा शहरातील महंमद महाराज मंदिर येथे ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, गावबंद करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Previous Post

हातेड बु. येथे रामलीला उत्सव उत्साहात साजरा होणार

Next Post

टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
40
Next Post
टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन

टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In