• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in Blog
0
टाकळी नवी जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम; ‘मुले शाळेत पाठवा’चा नारा देत चौकाचौकांत शिक्षण प्रदर्शन
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

माहूर प्रतिनिधी 🖊️

माहूर तालुक्यातील टाकळी नवी येथील जिल्हा परिषद शाळेने १०० टक्के पटसंख्या गाठण्याच्या उद्देशाने एक अभिनव उपक्रम राबवत संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. “शाळेत पाठवा, शाळेत पाठवा, आपली मुले शाळेत पाठवा!” असा जोरदार नारा देत विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढली आणि शिक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी प्रदर्शन न भरवता गावातील विविध चौकांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे प्रदर्शन मांडण्यात आले. प्रत्येक चौकात विद्यार्थ्यांनी नागरिकांना संबंधित विषयांची माहिती देत ज्ञानगंगा प्रवाहित केली.

विषयानुसार विद्यार्थ्यांचे सादरीकरण:

  • गणित: धमप्रिया घाळवट
  • हिंदी: परिणीती कांबळे
  • भूगोल: तन्वी बेंद्रे
  • मराठी व इंग्रजी: कु. जान्हवी भगत
  • विज्ञान: समर्थ चिवटे व जान्हवी भगत
  • इतिहास: दिव्यांका खाडे

कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गावातून रॅली काढून पालकांना आपल्या मुलांना नियमित शाळेत पाठवण्याचे आवाहन केले. उपक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘सामूहिक भेळ’ तयार करून सहकार्य आणि आनंदातून शिक्षण घेण्याचा संदेश दिला.

रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या महापुरुषांच्या वेशभूषाही विशेष आकर्षण ठरल्या. अपूर्व भवरे यांनी महात्मा फुले, स्वराज कांदे यांनी संत गाडगे बाबा आणि खुशी घाळवट यांनी सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

या उपक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुद्रशिल भवरे, डॉ. आनंद अडकिने, राहुल राऊत तसेच सावित्रीबाई शिक्षण समितीचे सदस्य महेंद्र घाळवट, निलेश कांदे, सचिन बियाळे, नामदेव आडे, संतोष गिरी आणि अनंता राऊत यांची उपस्थिती लाभली.

मुख्याध्यापक चेवटे सर आणि श्री. खोंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. १०० टक्के हजेरीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शाळेने राबवलेल्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

खंडणीला विरोध केल्याने महिला व्यावसायिकेला बेदम मारहाण; श्रीगोंद्यात संताप, गावबंदाबाबत आज बैठक

Next Post

गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
22
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
82
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर

गुरुद्वारा बोर्डाचा १७० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; शैक्षणिक व सामाजिक योजनांवर भर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In