• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात टीचर्स प्रीमियर लीग; आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते सिझन थ्रीचे उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in Blog
0
शहाद्यात टीचर्स प्रीमियर लीग; आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते सिझन थ्रीचे उद्घाटन
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २२ (प्रतिनिधी) 🖊️

शिक्षकांमधील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बहुप्रतिक्षित टीचर्स प्रीमियर लीग (TPL) 2026 – सिझन थ्रीचा शहादा येथे उत्साहात प्रारंभ झाला. पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आमदार Rajesh Padvi यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या संकल्पनेतून व समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी आमदार पाडवी यांनी स्पर्धेच्या भव्य चषकाचे अनावरण केले. यावेळी प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, एपीआय निलेश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. अरविंद कांबळे, सचिव डॉ. महेश जगताप, प्रा. डॉ. जितेंद्र माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनावेळी बोलताना आ. पाडवी म्हणाले की, “सुट्टीच्या दिवशी सहसा नोकरदार वर्ग पर्यटनाला प्राधान्य देतो; मात्र येथे शिक्षक मोठ्या संख्येने मैदानात खेळताना दिसत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. शिक्षकांच्या या सहभागामुळे विद्यार्थीदेखील क्रीडेकडे आकर्षित होतील, ज्यातून त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळेल.”

दि. २० मार्च ते २२ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील विविध भागांतून शिक्षक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. अप्सरा फायटर, छत्रपती वॉरियर्स, अक्राणी वॉरियर्स, श्रीराम वॉरियर्स, टीचर सुपर किंग्स, एफ.सी.सी. लायन्स, एफ.सी.सी. हंटर्स आणि बिस्की रॉयल्स अशा संघांमधून शहादा, नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, नवापूर व शिरपूर येथील एकूण १२३ शिक्षक खेळाडू आपले कौशल्य दाखवत आहेत.

स्पर्धेतील विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी खेळाडूंना आकर्षक मेडल, टी-शर्ट आणि कॅप्स देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. अरविंद कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. महेश जगताप यांनी केले. पंच म्हणून आशिष सोनवणे, ओंकार पवार, प्रदीप कोळी व बबलू यादव यांनी काम पाहिले.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. अनिल बेलदार, डॉ. खुमानसिंग वळवी, डॉ. जितेंद्र माळी, सुनील भांडारकर, स्वप्नील जैन तसेच क्रीडा विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Previous Post

प्रशासन पोहोचले जनतेच्या दारी! म्हसावद येथे ‘महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न

Next Post

हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

Related Posts

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक
Blog

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
4
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026
20
बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन
Blog

बरड वस्तीतील बाल गणेश मंडळाचे थाटात विसर्जन

September 26, 2026
78
सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Blog

सुरजागड इलाक्यातील विविध समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 26, 2026
0
अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!
Blog

अपर तहसीलच्या निर्णयाने जारावंडीच्या तोंडाला पाने पुसली!

September 26, 2026
0
जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार
Blog

जनता पूर्व प्राथमिक शाळा खोपोलीच्या मुख्याध्यापिका सौ. समिक्षा ढोके यांना महाराष्ट्र राज्य आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार

September 26, 2026
0
Next Post
हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

हरि अण्णा जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; मुंजवाड–तरसाळी फाटा रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In