• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुरंगली येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुरंगली येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा; शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचा संदेश
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

भोकरदन:
आज दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सुरंगली (ता. भोकरदन, जि. जालना) येथे जागतिक पाणी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ISAP इंडिया फाऊंडेशन व PRIF यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘समृद्ध शेतकरी प्रकल्पा’ अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, कृषी सहाय्यक उषा उबाळे, तसेच ISAP इंडिया फाऊंडेशनचे रिजनल मॅनेजर लक्ष्मीकांत दुधगावकर प्रमुख उपस्थित होते. याशिवाय गावातील उद्योजक योगेश जाधव यांचीही विशेष उपस्थिती होती.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

यावेळी शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बदलत्या वातावरणामुळे पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. ठिबक सिंचनाचा वापर, शेतात CCT, DCT, बांधबंदिस्ती करणे यामुळे जमिनीची धूप कमी करता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी महाविस्तार AI या अ‍ॅपचा वापर करून पीक व पाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले.

लक्ष्मीकांत दुधगावकर यांनी ‘समृद्धी शेतकरी प्रकल्पा’ अंतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देताना अवजार बँकेचे महत्त्व सांगितले. बूम स्प्रेअर व मक्का थ्रेशर यांसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी युवा उद्योजक योगेश जाधव यांनी स्वतःच्या शेतातील प्रयोगांच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे, तसेच माती परीक्षणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना माती परीक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. ISAP इंडिया फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सिद्धार्थ गवई यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी योगेश बुलगे (जिल्हा समन्वयक, जालना) यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक काळे सर तसेच भाऊसाहेब काळे, राजेंद्र धनवई, प्रमोद सोनवणे, भास्कर दौड, विनोद जयस्वाल, किरण लांडगे, प्रवीण पन्हाळे, रामेश्वर लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

जागतिक पाणी दिनानिमित्त शेतकऱ्यांनी पाणी संवर्धनाच्या उपाययोजना अंगीकारून शेती अधिक समृद्ध करावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Tags: Sanjiv Patil
Previous Post

गॅस सिलिंडर दरवाढ व टंचाईविरोधात नांदगाव खंडेश्वर येथे काँग्रेसचे आंदोलन

Next Post

सेलूतील मादी बिबट्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; दोषींवर निलंबनाची मागणी

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
40
Next Post

सेलूतील मादी बिबट्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करा; दोषींवर निलंबनाची मागणी

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In