• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्यात जागतिक ग्राहक दिन साजरा न झाल्याने ग्राहक संघटना आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा प्रतिनिधी :
दरवर्षीप्रमाणे २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन आणि १५ मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही श्रीगोंदा तालुक्यात यंदा जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम न झाल्यामुळे ग्राहक संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांत हा दिन साजरा केला जातो. मात्र, १५ मार्चनंतर आठ दिवस उलटूनही श्रीगोंद्यात कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

यासंदर्भात पुरवठा अधिकारी ज्ञानेश्वर कोरे यांनी “१५ मार्च रोजी रविवार असल्याने कार्यक्रम कसा घ्यायचा?” असा प्रश्न उपस्थित करत नंतर तारीख कळवू असे सांगितल्याचा दावा ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसचिव जितेंद्र पितळे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की, गेल्या २०-२२ वर्षांपासून ग्राहक दिन औपचारिक पद्धतीने साजरा केला जातो. शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर होत नसून अनेक अधिकारी या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करतात.

तसेच, ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत असतानाही तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि इतर प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहून भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष अनंता पवार यांनी इशारा दिला की, लवकरात लवकर जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित न केल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घेराव घालण्यात येईल.

या वेळी प्रदीप डहाळे, शिवाजी साळुंके, सुरेश पिपाडा, गणेश लाढाणे, संतोष रोडे, दत्तात्रय हिरडे, प्रमोद पवार, किरण शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

👉 आता प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष देते आणि ग्राहकांना न्याय मिळतो का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

‘हर घर जल’ कागदावरच; सुरगाव ग्रामपंचायतीविरोधात नागरिक आक्रमक

Next Post

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In