• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा :- प्रतिनिधी

श्रीगोंदा शहरासह संपूर्ण तालुक्यात रमजान ईद (ईद-उल फित्र) शनिवार (दि.२१ मार्च) रोजी मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली. सकाळी १० वाजता शहरातील आनंदकर मळा येथील ईदगाह मैदानावर मौलाना जैनुद्दीन आतार यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक नमाज अदा करण्यात आली. या नमाजसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. महिलांची सामुदायिक नमाज सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पार पडली.

RelatedPosts

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

रमजान महिन्यातील रोजांच्या समाप्तीनंतर ईद साजरी केली जाते. ३० दिवसांच्या उपवासानंतर शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने शनिवारी ईद साजरी करण्यात आली. शहरातील विविध मशिदींमध्ये सकाळपासूनच नमाज पठणासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

ईदगाहवरील सामुदायिक नमाजनंतर देशाची समृद्धी, शांतता आणि धार्मिक सौहार्द यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर कब्रस्तान व दर्गाह येथे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. घरोघरी शीरखुर्मा, गुलगुले यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेतला गेला.

या दिवशी मुस्लिमांसह इतर समाजबांधवांनीही एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यामुळे शहरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.

ईदगाह येथे माजी मंत्री बबनराव पाचपुते, घनश्याम शेलार, मनोहर पोटे, संजय खेतमाळीस, अक्षय अनभुले, शहाजी खेतमाळीस, एम. डी. शिंदे, प्रशांत गोरे, दादा औटी, नानासाहेब आंदनकर, अनिल महाराज औटी, अरविंद कापसे, नाना शिंदे, मुकुंद सोनटके, भाऊसाहेब खेतमाळीस, दिपक शिंदे, रावसाहेब घोडके, अशोक आळेकर, योगेश भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे आयोजन जामा मस्जिद ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. तसेच ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

🔶 चौकट :
सायंकाळी ७ वाजता सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे ट्रस्ट आणि नगरसेवक आमीनमाई शेख यांच्या वतीने हिंदू-मुस्लिम बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग घेत शीरखुर्मा, गुलगुले, भजी यांचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

श्रीगोंद्यात जागतिक ग्राहक दिन साजरा न झाल्याने ग्राहक संघटना आक्रमक

Next Post

५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण; माका येथे उत्साहात सोहळा

Related Posts

ताज्या घडामोडी

मालगाडीच्या डब्यात नवजात बालिका आढळली; आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे चिमुकलीचे प्राण वाचले

June 26, 2026
10
ताज्या घडामोडी

पंजा भेटीनंतर खत्तल रात्र व खाई खेळणीचे कार्यक्रम उत्साहात संपन्न

June 26, 2026
13
ताज्या घडामोडी

नेशन बिल्डर टिचर्स अवॉर्डद्वारे शिक्षकांचा गौरव

June 26, 2026
17
ताज्या घडामोडी

सैनिक टाकळी गावच्या सैनिकी परंपरेला काळीमा फासणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द करा; ग्रामस्थांचा इशारा

June 26, 2026
5
ताज्या घडामोडी

हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या; समोर लगेच बाटल्या ठेवू नका — आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश

June 25, 2026
8
ताज्या घडामोडी

कोल्हापूरच्या ‘पाटगावचा’ जगभर डंका; चौथीच्या इंग्रजी पुस्तकातून विद्यार्थ्यांना चाखायला मिळणार ‘मधाच्या गावाचा’ गोडवा

June 25, 2026
15
Next Post
५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण; माका येथे उत्साहात सोहळा

५५ लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण; माका येथे उत्साहात सोहळा

ताज्या बातम्या

कडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा सोहळा उत्साहात संपन्न

June 26, 2026

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ कडेगावात आंदोलन; बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

June 26, 2026

निमसोड येथे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती व दमदाटी केल्याची तक्रार

June 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In