• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाडळदा येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाडळदा येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) — पाडळदा (ता. शहादा) येथे दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी दि. २३ मार्च रोजी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), नंदुरबार आणि राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर आणि लुईस ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आला. यावेळी दिव्यांग बांधवांनी स्वावलंबी होण्यासाठी या महान व्यक्तींचा आदर्श प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

RelatedPosts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

या शिबिरात दिव्यांगांसाठी विविध तांत्रिक व प्रशासकीय कामांबाबत मोलाची मदत करण्यात आली. युथ फॉर जॉब्स संस्थेचे जिल्हा समन्वयक लालसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ३५ दिव्यांग बंधू-भगिनींची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १५ जणांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, तर ५ नवीन युनिक आयडी (UDID) कार्डसाठी अर्ज सादर करण्यात आले. तसेच २ लाभार्थ्यांच्या जन्मतारखांमधील त्रुटी दुरुस्त करण्यात आल्या.

तपासणीदरम्यान ६ ते ७ दिव्यांगांकडे अद्याप ऑनलाइन अपंगत्व प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आले. संबंधितांना पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष शिवाजीराव मोरे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कुवर, पाडळदा गावचे सरपंच राजेंद्रभाई पाटील, सुनिताताई कुवर, योगिता पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील आणि शांतीलाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

उपस्थित दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, अशा शिबिरांमुळे ग्रामीण भागातील दिव्यांगांना जिल्हास्तरावर न जाता स्थानिक पातळीवरच आवश्यक सेवा व मार्गदर्शन मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

नंदुरबारच्या श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनला राष्ट्रीय सन्मान

Next Post

कंदर येथील गोरख देवकर यांचे निधन

Related Posts

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
ताज्या घडामोडी

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
9
पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
5
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
48
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
16
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
Next Post
कंदर येथील गोरख देवकर यांचे निधन

कंदर येथील गोरख देवकर यांचे निधन

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In