• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजऱ्यात ‘गजराजा’चा थरार; स्कूल बस उलटवली, कारचे नुकसान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील सिरसंगी परिसरात रानटी Asian Elephant (हत्ती) पुन्हा एकदा भरवस्तीत शिरून धुमाकूळ घातल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास हत्तीने घराशेजारी उभी असलेली स्कूल बस उलटवून टाकली, तर एका चारचाकी वाहनाचेही नुकसान केले.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबुराव बुडके यांच्या घराशेजारी गडहिंग्लज येथील ‘श्रीपतराव शिंदे शिक्षण समूहा’ची बस उभी होती. हत्तीने जोरदार धडक देत ही बस उलटवून टाकली. तसेच, अनिल निकम यांची ओम्नी कार काजू फॅक्टरीशेजारी उभी असताना तिच्या मागील काचेची तोडफोड करण्यात आली. यापूर्वीही दहा दिवसांपूर्वी बैलगाडीचे नुकसान झाल्याची घटना घडली होती.

RelatedPosts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

दरम्यान, या हत्ती आणि Gaur (गवा) यांच्या कळपामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या १५ दिवसांत किणे व सिरसंगी परिसरातील सुमारे ४ ते ५ एकर ऊस पिकाचे नुकसान झाले असून पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या तसेच केळी व काजूच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून संताप व्यक्त करत आहेत.

वन विभागाच्या गस्ती पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “गस्ती पथक असते कुठे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत, कारण गस्ती असूनही हत्ती वारंवार वस्तीत शिरून नुकसान करत आहे.

दरम्यान, वन विभागाकडून मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत अपुरी असल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी “आमची शेतीच भाडेतत्त्वावर घ्यावी,” अशी संतप्त मागणी केली आहे. सततच्या या उपद्रवामुळे सिरसंगी परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आले असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा नगरपंचायत प्रभाग क्र. ९ मध्ये विकासकामांचा धडाका; सुभाष गल्लीतील रस्ते कामाचा शुभारंभ

Next Post

ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

Related Posts

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
ताज्या घडामोडी

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026
1
विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडी प्रभाग क्रमांक १ मध्ये भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

September 27, 2026
15
रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात
ताज्या घडामोडी

रयत संकुलाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

September 27, 2026
16
आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?
ताज्या घडामोडी

आधारच्या अटीमुळे शिक्षक अतिरिक्त होणार?

September 27, 2026
22
ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
9
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
41
Next Post
ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

ज्ञानेश्वर कौसाईतकर यांना राज्यस्तरीय आदर्श कलाध्यापक पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In