• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबा-काजू शेतकऱ्यांचा एल्गार; नुकसान भरपाईसाठी महामार्गावर रास्ता रोको

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
March 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
आंबा-काजू शेतकऱ्यांचा एल्गार; नुकसान भरपाईसाठी महामार्गावर रास्ता रोको
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव येथे हे आंदोलन पार पडले.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा”, “आंबा-काजू शेतकरी उपाशी, भोंदू सरकार तुपाशी”, “कृषिमंत्र्यांचे करायचं काय, खाली डोके वर पाय” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मात्र, यामुळे आंदोलनकर्ते अधिक आक्रमक झाले. राजू शेट्टी आणि वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी हुंबरठच्या दिशेने पायी मोर्चा काढत पुन्हा महामार्ग रोखला. तब्बल तीन ते साडेतीन किलोमीटर पायी चालत जाऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, “आंबा आणि काजू बागायतदारांसाठी आम्ही रस्त्यावर बसलो आहोत. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय येथून उठणार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात इतर मुद्द्यांवर चर्चा होते, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत, आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही कोणाचाही खेळ बिघडवू शकतो. महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या सविनय कायदेभंगाच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत. सरकार आम्हाला उन्हात बसवून शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांपासून देवगड आणि वेंगुर्ला येथील बागायतदार आंदोलन करत आहेत. १२ मार्चच्या मोर्चानंतरही शासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पालकमंत्र्यांनी भेट देऊन आश्वासन दिले, मात्र त्यानंतर कोणतीही कारवाई झालेली नाही. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही, पण आंदोलन दडपण्यासाठी मार्ग बदलला जातो. नुकसान भरपाई मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.”

या आंदोलनामुळे महामार्ग काही काळ ठप्प झाला होता. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि अधिवेशन संपण्यापूर्वी आंबा व काजू बागायतदारांना नुकसान भरपाई देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष काका ढोके, विजय नाईक, संजय गावडे, एम. के. गावडे, व्ही. के. सावंत, बाळू मेस्त्री, प्रवीण वरणकर, गणेश गावकर, उत्तम लोके यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा व काजू बागायतदार सहभागी झाले होते.

मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास येत्या काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

Tags: Amit Tendulakr
Previous Post

वानखडे नगरात हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी

Next Post

नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
30
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
58
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
13
Next Post
नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नांदेडकरांनो अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In