• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चेष्टा मस्करीचा रक्तरंजित शेवट! वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, आजऱ्यात तणाव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in क्राईम, ताज्या घडामोडी
0
चेष्टा मस्करीचा रक्तरंजित शेवट! वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, आजऱ्यात तणाव
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
मित्रांमधील साधी थट्टा मस्करी अचानक जीवघेण्या वादात बदलल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहरात बुधवारी रात्री घडली. किरकोळ वादातून झालेल्या चाकू हल्ल्यात २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सुमारे दहा वाजता नाईक गल्ली येथील मरकज मस्जिद समोर काही मित्र एकत्र जमले होते. सुरुवातीला सुरू असलेली थट्टा मस्करी काही वेळातच वादात बदलली. हा वाद चिघळत गेल्यानंतर संशयित अरकाम लमतुरे याने चाकूने कैफ खतीब, समी तकिलदार आणि आतिफ हिंग्लजकर यांच्यावर हल्ला केला. इतर दोन संशयितांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची माहिती आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

या हल्ल्यात कैफ साजिद खतिब (वय २३) याला छातीवर गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी गडहिंग्लज येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. समी तकिलदार (वय २६) आणि आतिफ हिंग्लजकर (वय १९) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अरकाम महम्मद लमतुरे, अबुसुफियान महम्मद लमतुरे आणि शकील हसनअली खेडेकर या तिघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मृत युवकाच्या घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक करत दुचाकीची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवला असून नाईक गल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे.

गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

योग्य भाव व तात्काळ पैसे; सुरेगावकर बाजार समिती ठरतेय शेतकऱ्यांची पहिली पसंती

Next Post

दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In