• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत सर्व महाविद्यालयीन क्रीडा संचालकांची पाचवी कार्यशाळा श्री विठ्ठलराव जोशी धर्मदाय संस्था क्रीडा अकादमी, कासारवाडी सावर्डे, डेरवण (चिपळूण) येथे उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी “जागतिक दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी विद्यापीठाकडून सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल,” असे प्रतिपादन केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी, उपकुलगुरू डॉ. अजय भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी आणि क्रीडा समिती सदस्य डॉ. चंद्रकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ३० जून ते ४ जुलै दरम्यान विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक सत्रांचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेत हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, बॅडमिंटन यांसारख्या क्रीडा प्रकारांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच योगसाधना, खेळाडूंचे आरोग्य, फिटनेस, थेरपी आणि आधुनिक प्रशिक्षण पद्धतींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. रुपेश थोपटे यांनी योगसाधनेचे महत्त्व पटवून दिले, तर डॉ. मानसी साताळकर यांनी खेळाडूंच्या आरोग्य व फिटनेस संदर्भात मार्गदर्शन केले.

ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी संपूर्ण सॉफ्टवेअर प्रणालीची माहिती श्रीमती स्मिता मनोहर यांनी प्रात्यक्षिकासह दिली. याशिवाय श्री. सानंद मित्रा यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा संचालकांसाठी प्रभावी नियोजन आणि मार्गदर्शन पद्धतींबाबत माहिती दिली. डॉ. आनंद लुंकड यांनी महाविद्यालयीन परीक्षण आणि NAAC प्रक्रियेतील गुणदान पद्धतीवर सविस्तर भाष्य केले.

कार्यशाळेदरम्यान आयोजित ओपन फोरममध्ये क्रीडा स्पर्धांमधील विविध अडचणी, खासगी असोसिएशनकडून होणाऱ्या गैरसोयी, तसेच खेळाडूंच्या सहभागासंदर्भातील नियमांवर चर्चा करण्यात आली. क्रीडा संचालक उपस्थित नसल्यास खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही तसेच गैरवर्तन झाल्यास संबंधित महाविद्यालय व क्रीडा संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले.

समारोप प्रसंगी विविध क्रीडा संचालकांनी आपले अनुभव व मते व्यक्त केली. डॉ. मनोज रेड्डी यांनी कार्यशाळेत मांडण्यात आलेल्या योग्य सूचनांची दखल घेत पुढील नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. आदित्य कुलकर्णी, प्रा. रोहिणी डोंबे, प्रा. राहुल अकुल, प्रा. गणेश मोरे, प्रा. शशांक उपशेटे, प्रा. मंदार कुलकर्णी, डॉ. मनोज वर्मा, प्रा. उमेश सोनवणे, डॉ. चंद्रकांत नाईक, रवी वर्मा, डॉ. यज्ञेश्वर बारगाव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी यांनी वाहतूक जनजागृतीचे महत्त्व पटवून देत शिक्षकांनी समाजात ट्रॅफिक अवेअरनेस निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

दरम्यान, सन २०२६-२७ साठी डॉ. मनोज वर्मा, डॉ. दिपाली पाटील, प्रा. गणेश मोरे आणि प्रा. सुशांक उपशेटे यांची झोन सचिव म्हणून निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व मान्यवरांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.

Tags: Mahajan Yashwwant
Previous Post

बोटकूळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर ‘आरटीआय’चा वॉच; ३० दिवसांत माहिती देण्याचे ग्रामसेवकांचे आश्वासन

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचा हाहाकार; नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पवना नदीचे पाणी शिरले

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In