• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी):
दौलत साखर कारखान्यातील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, वारंवार आश्वासने मिळूनही थकीत वेतन न मिळाल्याने संतप्त कामगारांनी आज, २ एप्रिल २०२६ पासून चंदगड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. ‘चंदगड तालुका साखर कामगार युनियन (CITU)’ च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले असून, “आता नाही तर कधीच नाही” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

कामगारांनी प्रशासनाकडे सादर केलेल्या निवेदनात जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील थकीत वेतन तात्काळ देण्याची प्रमुख मागणी केली आहे. याशिवाय मागील हंगामातील रिटेनिंग अलाउन्स, चालू हंगामातील ओव्हरटाईमचे पैसे, त्रिपक्षीय कराराची पूर्ण अंमलबजावणी, हंगामी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे आणि बेकायदेशीर बदल्या रद्द करण्याच्या मागण्यांचाही समावेश आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

कारखाना प्रशासनाने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता कामगारांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला असून, मागण्यांची लेखी पूर्तता आणि प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

“आम्ही आमचे रक्त आटवून कारखाना चालवला, पण आज आमच्याच कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने आमचा अंत पाहू नये,” अशी भावना आंदोलक कामगारांनी व्यक्त केली.

या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून तहसील कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासन यांच्याकडून या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण चंदगड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

चेष्टा मस्करीचा रक्तरंजित शेवट! वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, आजऱ्यात तणाव

Next Post

आजरा नगरपंचायत दुकान भाडेवाढ वाद चिघळला; सुनील शिंदे यांची मध्यस्थी, दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
54
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
16
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
7
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
16
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post

आजरा नगरपंचायत दुकान भाडेवाढ वाद चिघळला; सुनील शिंदे यांची मध्यस्थी, दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In