• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनता सहकारी बँक आजराची गरुडझेप; ९.९१ कोटी नफा, ४७५ कोटी ठेवींचा टप्पा पार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
सहकारी बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जनता सहकारी बँक लि. आजरा या बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भक्कम झेप घेतली आहे. बँकेने ९ कोटी ९१ लाख रुपयांचा करपूर्व नफा मिळवला असून ४७५ कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याची माहिती चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी दिली.

मार्च २०२६ अखेरच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवी ४७६ कोटी १० लाख रुपयांवर पोहोचल्या असून एकूण कर्जवाटप २९२ कोटी ३६ लाख रुपये आहे. बँकेची गुंतवणूक २२५ कोटी ५५ लाख रुपये असून एकूण व्यवसाय ७६८ कोटी ४६ लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे बँकेचा एनपीए शून्य टक्के असल्याने बँकेचा पारदर्शक आणि सक्षम कारभार अधोरेखित झाला आहे. सीडी रेशो ६१.४७ टक्के तर सीआरएआर १५.२१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी बँकेने कोल्हापूर येथे अद्ययावत डेटा सेंटर सुरू केले आहे. सध्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे आणि मुंबई परिसरात बँकेच्या २१ शाखा कार्यरत असून, रिझर्व्ह बँकेकडून कल्याण शाखेला मंजुरी मिळाल्याने विस्ताराला आणखी गती मिळणार आहे.

बँकेच्या यशात कर्मचारी आणि सभासदांचा मोठा वाटा असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के बोनस आणि रजेच्या पगाराची तरतूद करण्यात आली आहे. आगामी वर्षात ५५० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार चेअरमन मुकुंददादा देसाई आणि सीईओ एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी व्हाईस चेअरमन अमित सामंत, संचालक महादेव टोपले, रणजित देसाई, जयवंत शिंपी, बाबाजी नाईक, शिवाजी पाटील, विक्रमसिंह देसाई यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा नगरपंचायत दुकान भाडेवाढ वाद चिघळला; सुनील शिंदे यांची मध्यस्थी, दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन

Next Post

प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
37
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
13
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
4
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
2
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
177
Next Post
प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांना ‘लोकशाहीर द. ना. गव्हाणकर’ पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In