• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा नगरपंचायत दुकान भाडेवाढ वाद चिघळला; सुनील शिंदे यांची मध्यस्थी, दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

आजरा (प्रतिनिधी):
आजरा नगरपंचायतीच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून, या वाढीला अन्यायकारक ठरवत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांच्याशी सविस्तर चर्चा करत दुकानदारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.

नगरपंचायतीने केलेली भाडेवाढ जास्त असल्याची तक्रार करत अनेक दुकानदारांनी प्रशासनाकडे आक्षेप नोंदवले होते. यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आता नगराध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत या प्रश्नाला नवे वळण मिळाले आहे.

RelatedPosts

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

चर्चेदरम्यान नगराध्यक्ष अशोक अण्णा चराटी यांनी स्पष्ट केले की, काही दुकानदारांनी वाढीव भाडे मान्य केले असले तरी ज्यांना ही वाढ मान्य नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यास प्रशासन तयार आहे. संबंधित दुकानदारांचे प्रतिनिधी म्हणून सुनील शिंदे यांनी चर्चेत सहभागी व्हावे, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

या पार्श्वभूमीवर सुनील शिंदे यांनी दुकानदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “प्रशासनाने मला प्रतिनिधी म्हणून बोलावले असले, तरी अंतिम निर्णय दुकानदारांच्या संमतीनेच घेतला जाईल. ज्यांना भाडेवाढ अमान्य आहे, त्यांनी संघटित होऊन आपली भूमिका ठामपणे मांडावी,” असे ते म्हणाले.

आगामी बैठकीत दुकानदारांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी, जेणेकरून न्याय्य तोडगा निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या भाडेवाढीच्या मुद्द्यावर अमान्य असणारे दुकानदार काय भूमिका घेतात आणि नगरपंचायत प्रशासन कोणता सुवर्णमध्य काढते, याकडे संपूर्ण आजरा शहराचे लक्ष लागले आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

दौलत कारखाना कामगारांचा एल्गार; थकीत पगारासाठी चंदगडमध्ये आमरण उपोषण सुरू

Next Post

जनता सहकारी बँक आजराची गरुडझेप; ९.९१ कोटी नफा, ४७५ कोटी ठेवींचा टप्पा पार

Related Posts

ताज्या घडामोडी

परभणी जिल्हा शिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुखपदी कमलताई राठोड यांची नियुक्ती

July 6, 2026
3
ताज्या घडामोडी

निर्गुणा नदीच्या पुलावरील कठडे बेपत्ता; अपघाताची भीती कायम, वर्ष उलटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

July 6, 2026
1
ताज्या घडामोडी

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

July 6, 2026
12
ताज्या घडामोडी

शाळेला कुलूप; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नवेगाव जि.प. शाळेत शिक्षकांना उशीर, विद्यार्थी गेटबाहेर ताटकळत!

July 6, 2026
11
ताज्या घडामोडी

जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी मुंबई विद्यापीठ कटिबद्ध – कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी

July 6, 2026
15
ताज्या घडामोडी

राज्य परिवहन महामंडळाची अनियमितता; विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा

July 6, 2026
17
Next Post

जनता सहकारी बँक आजराची गरुडझेप; ९.९१ कोटी नफा, ४७५ कोटी ठेवींचा टप्पा पार

ताज्या बातम्या

सोशल मीडिया बळकटीकरणासाठी शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सोलापूरातून सुरुवात

July 6, 2026

पदोन्नती व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विदर्भ पटवारी संघाकडून सपत्नीक सत्कार

July 6, 2026

इयत्ता ६ वीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी तालुकास्तरीय चार दिवसीय शिक्षकीय प्रशिक्षणास प्रारंभ

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In