• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न? — बदनापूर आठवडी बाजारावरून गोंधळ तीव्र

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न? — बदनापूर आठवडी बाजारावरून गोंधळ तीव्र
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

बदनापूर :
शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा बनत असून, नियोजनातील विसंगतीमुळे व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

बाजारातील जागेच्या प्रश्नावरून दिवसभर वादावादीचे वातावरण होते. स्थानिक व्यापाऱ्यांनी पहाटेपासूनच जागा निश्चित करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामीण व बाहेरील व्यापाऱ्यांसाठी कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने नाराजी वाढली.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती बदनापूर यांनी जाहीर सूचनेद्वारे स्पष्ट केले की, दि. ०३ एप्रिल २०२६ पासून आठवडी बाजार मार्केट यार्डात भरविण्यात येणार नाही. मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार गट क्रमांक ११० मध्ये बाजार भरविण्याचे सांगण्यात आले असून, मार्केट यार्डात दुकाने लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

नगर पंचायत बदनापूरकडूनही नवीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार बालाजी मंदिर परिसर, बालाजी गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नागोरी यांच्या घरापर्यंत, तसेच गणेशनगर, पवार गल्ली, गणपती गल्ली, माळी गल्ली, ज-हाड गल्ली आणि होळकर चौक परिसरात बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला व इतर दुकाने या भागात, तर मांस विक्रीसाठी खाटीक मोहल्ल्याच्या मागील परिसर निश्चित करण्यात आला आहे. तसेच जालना–औरंगाबाद महामार्ग व अकोला रोडवर दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, या निर्णयाविरोधात नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकारी, नगरपंचायत बदनापूर यांना दिलेल्या निवेदनात नागरिकांनी स्पष्ट केले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, माळी गल्ली, गणपती गल्ली व पवार गल्ली हे पूर्णतः रहिवासी व अरुंद रस्त्यांचे भाग असून येथे बाजार भरविल्यास वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होईल.

निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, बाजारामुळे केरकचरा साचून दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे रोगराई वाढू शकते. तसेच गर्दीमुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले आहे की, बाजार अन्यत्र स्थलांतरित न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यास पूर्णतः नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील.

एकीकडे प्रशासनाचे आदेश आणि दुसरीकडे नागरिकांचा तीव्र विरोध, यामुळे बदनापूरचा आठवडी बाजार सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, या प्रश्नावर तोडगा काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.

Previous Post

क्रांतीसूर्य महात्मा फुले पुरस्काराने रवींद्र महाजन यांचा गौरव

Next Post

“संवादातून तोडगा काढा; अन्यथा प्रश्न चिघळेल” — ॲड. अकरमखान अब्दुलमजीदखान पठाण यांची ठाम भूमिका

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
8
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
3
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
2
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
10
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
15
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
8
Next Post

“संवादातून तोडगा काढा; अन्यथा प्रश्न चिघळेल” — ॲड. अकरमखान अब्दुलमजीदखान पठाण यांची ठाम भूमिका

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In