• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सूर्यफुलातून ‘पिवळं सोने’; पोई गावच्या शिक्षक-शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
सूर्यफुलातून ‘पिवळं सोने’; पोई गावच्या शिक्षक-शेतकऱ्याचा आदर्श प्रयोग
0
SHARES
59
VIEWS
Ad 1

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यातील पोई गावातील शिक्षक-शेतकरी गुरुनाथ सांबरे यांनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतीमुळे आदर्श निर्माण केला आहे. विविध पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केवळ उत्पादन वाढवले नाही, तर इतर शेतकऱ्यांनाही नव्या दिशेने प्रेरित केले आहे.

सांबरे यांनी स्ट्रॉबेरी, सुरण, आले, हळद, झेंडू, भाजीपाला व भात यांसारख्या पिकांमध्ये यशस्वी प्रयोग केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड या देशांचा शेती अभ्यास दौरा करून तेथील तंत्रज्ञान आपल्या शेतीत प्रभावीपणे वापरले आहे.

RelatedPosts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यंदा त्यांनी पोई गावात एक एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन व मल्चिंगच्या साहाय्याने सूर्यफुलाची लागवड केली असून हा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे. जिल्हा परिषद ठाणे व कल्याण पंचायत समितीच्या शेष फंडांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून त्यांनी ‘पिवळं सोने’ पिकवले आहे. त्यांच्या शेतातील सूर्यफुलांचे आकार व उत्पादन पाहून अनेक शेतकरी, पर्यटक आणि कृषी अधिकारी आकर्षित झाले आहेत.

सांबरे यांच्या मते, सूर्यफूल शेती कमी खर्च, कमी पाणी व कमी मेहनतीत अधिक उत्पन्न देणारी आहे. एकरी सुमारे १५ हजार खर्चात ८ ते ९ क्विंटल उत्पादन मिळते. यापासून लाकडी घाण्यावर तेल काढल्यास सुमारे ३५० लिटर तेल उत्पादन मिळू शकते. सध्या या तेलाला चांगला बाजारभाव मिळत असून एकरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

या यशस्वी प्रयोगामुळे ठाणे जिल्ह्यात सूर्यफूल शेतीला नवी दिशा मिळाली असून इतर शेतकऱ्यांनीही या पिकाकडे वळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच कृषी विभागाने अधिक अनुदान देऊन तेलबिया उत्पादन वाढीस चालना द्यावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

Tags: Gurunath Sambre
Previous Post

वाई नगरपरिषदेच्या गटार कामांवर प्रश्नचिन्ह; दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप

Next Post

पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

Related Posts

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई
ताज्या घडामोडी

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026
5
शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना
ताज्या घडामोडी

शिक्षक भारती नांदेड जिल्हा कार्यकारिणीची पुनर्रचना

October 5, 2026
2
कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
ताज्या घडामोडी

कृषी तंत्र विद्यालय सुकिवलीत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

October 5, 2026
1
काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

काठी चिपटन संस्थानच्या दसरा उत्सवाच्या नियोजनाची बैठक संपन्न

October 5, 2026
9
पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात
ताज्या घडामोडी

पेण नगरपरिषद शाळा क्र. १ मध्ये माजी विद्यार्थी-शिक्षक स्नेहसंमेलन उत्साहात

October 5, 2026
2
आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
5
Next Post
पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

पाथरीतील शिक्षक कॉलनीत हनुमान जयंती उत्साहात; भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

पनवेलमध्ये अतिक्रमणाविरोधात पालिकेची धडक कारवाई

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In