• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंद्यात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन भक्तिमय व उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
श्रीगोंद्यात भगवान महावीर जन्म कल्याणक दिन भक्तिमय व उत्साहात साजरा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा, (प्रतिनिधी) : श्री सकल जैन श्रावक संघ, श्रीगोंदा यांच्या वतीने २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा जन्म कल्याणक दिन शहरात भक्तिमय वातावरणात व विविध सामाजिक उपक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळपासूनच जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. पहाटे साडेपाच वाजता दैनंदिन प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साडेसात ते दहा वाजेपर्यंत शहरात भव्य, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध शोभायात्रा काढण्यात आली. सर्व बांधव व भगिनींनी एकसारखा पेहराव परिधान केल्याने शोभायात्रेला विशेष आकर्षण लाभले.

RelatedPosts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

शोभायात्रेदरम्यान समाजबांधवांकडून ठिकठिकाणी पाणी, आईस्क्रीम व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. रस्त्यावर कुठलाही कचरा न टाकता स्वच्छतेचा आदर्श घालून देत जैन बांधवांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला.

शोभायात्रा जैन स्थानकात पोहोचल्यानंतर भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री निर्मलजी छाजेड व मनोजजी पटेरिया (बडनेरा, अमरावती) यांनी भगवान महावीरांचा संदेश व त्यांचे जीवनतत्त्वज्ञान भक्तिगीते व प्रवचनांच्या माध्यमातून उपस्थितांपर्यंत पोहोचवले.

या कार्यक्रमास परिक्रमा ग्रुपच्या डॉ. प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्ष सौ. अलकाताई अनभुले, गटनेत्या मीराताई शिंदे, नगरसेवक एम. डी. शिंदे, सुशीलकुमार शिंदे, सागर गोरे, प्रशांत गोरे, महावीर पटवा, टिळक भोस, आघाव भाऊसाहेब, गोपाळराव मोटे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सकल जैन संघाचे युवक कार्यकर्ते व सद्भावना मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वडाळी रोडवरील अभयारण्यातील वन्यजीवांसाठी बनवलेल्या पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी सोडून सामाजिक उपक्रमही राबवला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अध्यक्ष विजयजी बोरा, विजय मुथा, सुरेंद्र गांधी, गणेश गुगळे, नवनीत मुनोत, संतोष भंडारी, दीपक भंडारी, संदीप कोठारी, सुनील भंडारी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Shrirang Salwe
Previous Post

जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा पानचिंचोली येथे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

Next Post

पहाडसिंगीतील बससेवा ठप्प; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, सेवा पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी

Related Posts

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू
ताज्या घडामोडी

आशाताई बुचके यांच्या स्मरणार्थ मोफत डायलिसिस सेंटर सुरू

October 4, 2026
0
कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

कोल्हापुरात ३१ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

October 4, 2026
0
विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; शिवगिरी ॲग्रोविरोधात चौकशीची मागणी

October 4, 2026
0
माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा
ताज्या घडामोडी

माजी सैनिक सुपुत्रांच्या देशसेवेला पखरूडमध्ये मानाचा मुजरा

October 4, 2026
35
विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
13
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
21
Next Post
पहाडसिंगीतील बससेवा ठप्प; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, सेवा पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी

पहाडसिंगीतील बससेवा ठप्प; विद्यार्थी व प्रवाशांचे हाल, सेवा पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी

ताज्या बातम्या

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

खुटवड डीपीवरील वीजतार तुटल्याने वीजपुरवठा खंडित

October 4, 2026
ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

ऋग्वेद हेल्थ बारामती फाउंडेशनचा आदर्श पुरस्कार सोहळा उत्साहात

October 4, 2026
वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

वीज गेली, अंधाराचा फायदा घेत बिबट्याची चिमुकल्यावर झेप; न्हाळेवाडीत हळहळ

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In