• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
घरकुल बिलासाठी नागरिक त्रस्त; उपोषणाचा इशारा
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

चाकूर | प्रतिनिधी

चाकूर तालुक्यातील तिवटघाळ येथील घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाचे बिल मिळत नसल्याने तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरकुलाचे बांधकाम पूर्ण होऊन तब्बल दहा महिने उलटूनही बिल न मिळाल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

लाभार्थ्यांनी बिलासाठी आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करूनही पाच महिन्यांपासून कोणतीही रक्कम मिळालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना कर्ज, मजुरी व इतर खर्च भागवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नागरिकांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, घरकुलाच्या बिलासाठी संबंधित अभियंत्याकडून वारंवार पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच लाभार्थ्यांना तात्काळ बिलाची रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून दखल न घेतल्यास सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ पासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

या उपोषणात श्री. धोंडीराम त्रंबक मुट्ठे, नामदेव रामराव बिराजदार यांच्यासह गावातील इतर नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Previous Post

तडसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन; १९ एप्रिलला लोकार्पण सोहळा

Next Post

कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
16
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
71
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
60
Next Post
कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

कन्नडमध्ये मनसे सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In