• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर
0
SHARES
76
VIEWS
Ad 1

विरार | प्रतिनिधी:
साईकृपा क्रिकेट संघ, बोरथळ यांच्या वतीने आयोजित स्वयंभू श्री जाखमाता देवी चषक – २०२६ स्पर्धा दि. ५ एप्रिल रोजी विरार येथील कोपरी, श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब मैदानावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत न्यू होप क्रिकेट संघ, लोणवडी यांनी दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात न्यू होप संघाने त्रिमूर्ती क्रिकेट संघ (शिवाजी नगर, आडे) यांचा पराभव केला. त्रिमूर्ती संघाने दिलेल्या ३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू होपच्या सलामीवीर अनिकेत रांगले आणि उमेश रहाटवळ यांनी आक्रमक फलंदाजी करत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यांच्या प्रभावी खेळीमुळे सामना एकतर्फी झाला आणि न्यू होप संघाने सहज विजय मिळवत चषकावर आपले नाव कोरले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

स्पर्धेत न्यू होप क्रिकेट संघ, लोणवडी विजेता ठरला, तर त्रिमूर्ती क्रिकेट संघ (शिवाजी नगर, आडे) उपविजेता ठरला. तृतीय क्रमांक श्री कालभैरव क्रिकेट संघ, केळशी (नवानगर) यांनी पटकावला.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून अमित चिमण, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून युग मिसाळ यांना गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या अनिकेत रांगले याने मालिकावीर (Man of the Series) पुरस्कार पटकावला. अंतिम सामन्यातही त्याने Man of the Match पुरस्कार मिळवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सेमी फायनलमध्ये उमेश रहाटवळ याने निर्णायक खेळी करत संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते.

क्वार्टर फायनलमध्ये अनिकेत रांगले याने केवळ ९ चेंडूत ४० धावा करत प्रेक्षकांची मने जिंकली. अनिकेत आणि उमेश यांच्या जोडीने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवत क्रिकेटप्रेमींना रोमांचित केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवई पंचक्रोशी क्रीडा समिती, दापोली (रत्नागिरी), पंच पॅनल तसेच समालोचक कल्पेश मालवे आणि दीपक कोकरे यांचे विशेष योगदान लाभले.

एकूणच, या स्पर्धेमुळे स्थानिक क्रिकेटला नवी उंची मिळाली असून खेळाडूंच्या गुणवत्तेला उत्तम व्यासपीठ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Tags: Rakesh Chilabe
Previous Post

प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
69
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
8
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
22
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
24
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In