• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
नंदुरबारमध्ये ९ सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारी नोटीस; आदेश रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
0
SHARES
142
VIEWS
Ad 1

अक्राणी | प्रतिनिधी:
नंदुरबार जिल्ह्यातील ९ सामाजिक कार्यकर्त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्याने आदिवासी युवा सेना संघटना आक्रमक झाली आहे. हा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने तहसीलदार, शहादा यांना निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत विविध उच्चस्तरीय अधिकारी व प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे. संबंधित कार्यकर्त्यांवर कोणतीही ठोस गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ही कारवाई राजकीय दबावाखाली व सुडबुद्धीने करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

RelatedPosts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

हद्दपारीच्या कारवाईत समाविष्ट असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे, बिरसा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष रविंद्र वळवी, बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, भारतीय स्वाभिमानी संघाचे महासचिव रोहीदास वळवी, जिल्हाध्यक्ष पंकज वळवी, तालुका अध्यक्ष अजय वळवी, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मुसळदे आणि ॲडव्होकेट राहुल कुंवर यांचा समावेश आहे.

दरम्यान, या कारवाईविरोधात जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून १०० हून अधिक आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निषेध नोंदवला. तसेच वकील संघटनांनीही या निर्णयाचा विरोध करत न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. शहादा ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने ठराव मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक (नाशिक परिक्षेत्र) तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन पाठविण्यात आले आहे.

हद्दपारीचा आदेश मागे न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आदिवासी युवा सेना संघटनेने दिला आहे.

Tags: Vasant Pawara
Previous Post

जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर

Next Post

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू – बिरसा फायटर्स

Related Posts

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली
ताज्या घडामोडी

कळंबोलीत बांधकामस्थळी संरक्षक भिंत कोसळली; अनेक दुचाकींचे नुकसान, जीवितहानी टळली

July 7, 2026
12
ताज्या घडामोडी

शिरूरमध्ये महावितरणच्या सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी; अॅव्हरेज बिलिंग व सेवा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

July 7, 2026
98
ताज्या घडामोडी

महाड तालुक्यातील कुर्ले घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प, सावधगिरीने प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन

July 7, 2026
5
येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त
ताज्या घडामोडी

येवला-मनमाड महामार्गावर मुरुमाऐवजी माती; चिखलामुळे प्रवासी आणि वाहनधारक त्रस्त

July 7, 2026
4
ताज्या घडामोडी

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026
2
ताज्या घडामोडी

सेवापूर्ती निमित्त सहाय्यक शिक्षक देवानंद पाटील यांचा सपत्नीक सत्कार

July 7, 2026
1
Next Post
पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू – बिरसा फायटर्स

पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढू - बिरसा फायटर्स

ताज्या बातम्या

तुफान पावसाने अंबरनाथ जलमय; घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल

July 7, 2026

विद्युत पारेषण प्रकल्पास कोडीत खुर्द ग्रामस्थांचा तीव्र विरोध; सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा

July 7, 2026

आंतरराष्ट्रीय शांतता व प्रेम दिनाचे महत्त्व

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In