• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
प्रशासकीय दुर्लक्षामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ; ६ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी:
मौजे वझूर (खु.) येथे शेत रस्ता बंद झाल्यामुळे वाव्हळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी आता आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. जनार्दन चोखोबा वाव्हळे व त्यांच्या कुटुंबीयांनी येत्या ६ एप्रिल २०२६ पासून मानवत तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार जनार्दन वाव्हळे यांची शेतजमीन गट क्रमांक ९२ मध्ये असून, त्यांच्या भावाची जमीन गट क्रमांक ७७ मध्ये आहे. या दोन्ही शेतांदरम्यान जाणारा पारंपरिक वहिवाट रस्ता उत्तम सोपान कटके यांनी अडवून बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ता बंद झाल्यामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद पडला असून, शेती पडीक राहिली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या प्रकरणी यापूर्वीही अनेक वेळा प्रशासनाकडे अर्ज करण्यात आले होते. २० जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. तसेच ११ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी पाथरी यांनीही याबाबत आदेश दिले होते. त्यानंतरही १९ जानेवारी, १८ फेब्रुवारी आणि २३ मार्च २०२६ रोजी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

“प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आम्ही हतबल झालो आहोत. रस्ता खुला न झाल्यास आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल,” असे अर्जदारांनी सांगितले. त्यामुळेच त्यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही वाव्हळे कुटुंबाने दिला आहे. या अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणाकडे प्रशासन कसे लक्ष देते आणि काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कुकडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न; शिपायापासून PSI पदापर्यंत प्रेरणादायी प्रवास

Next Post

जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post
जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर

जाखमाता देवी चषक २०२६ स्पर्धेत न्यू होप लोणवडी विजेता; अनिकेत रांगले मालिकावीर

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In