• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यात ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी; अनुदानित महाविद्यालयांना दिलासा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
राज्यात ५,०१२ प्राध्यापक पदांच्या भरतीला मंजुरी; अनुदानित महाविद्यालयांना दिलासा
0
SHARES
18
VIEWS
Ad 1
Ad 1

नागपूर : गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची हजाराे पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामांवर परिणाम हाेत आहे. या समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारने केला असून राज्यातील प्राध्यापकांच्या ५,०१२ पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे.त्यामुळे महाविद्यालयांना काही अंशी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

राज्याभरातील विद्यापीठांशी संलग्नित अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची २० हजारांवर पदे रिक्त आहेत. केवळ नागपूर विभागातच प्राध्यापकांची २,५०० च्यावर पदे रिक्त आहेत. काेराेना महामारीपासून प्राध्यापकांची पदभरती रखडली हाेती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह महाविद्यालयांच्या शैक्षणिक कामांवरही परिणाम हाेत आहेत. त्यासाठी विविध संघटनांकडून आणि विद्यापीठांकडूनही प्राध्यापक भरतीची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने राज्यभरातील आता अनुदानित महाविद्यालयांसाठी प्राध्यापकांच्या ५,०१२ पदांच्या भरतीसाठी मंगळवारी मंजुरी दिली. यात नागपूर विभागातील ४२५ पदांचाही समावेश आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डाॅ. संताेष चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार प्राध्यापक पद भरतीची मंजुरी मिळाली आहे. आता महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचे राेस्टर तयार करून पाेर्टलवर टाकण्यात येईल व त्यानंतरच भरतीची जाहीरात काढली जाईल. या प्रक्रियेला महिनाभराचा काळ लागू शकताे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर विभागात अडीच हजारावर पदे रिक्त

नागपूर विभागात २,५०० च्यावर पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनुदानित महाविद्यालयांना शैक्षणिक समस्येचा सामना करावा लागताे आहे. त्याला पर्याय म्हणून नागपूर विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे, ज्यावर शिक्षणाचा डाेलारा उभा आहे. त्यातील केवळ ४२५ पदांना मंजुरी मिळाली आहे.

घाईघाईत एनईपी लागू करण्याचा फटका

नागपूर विभागात अडीच हजारावर पदे रिक्त असताना केवळ सव्वा चारशे पदांना मंजुरी मिळाली आहे. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘नवीन शिक्षण धाेरण २०२०’ घाईघाईत लागू करणे पदसंख्या कमी हाेण्यास कारणीभूत ठरल्याची टीका सिनेट सदस्य अॅड. मनमाेहन वाजपेयी यांनी केली. इतर विद्यापीठांनी एनईपी लागू करण्यास घाई केली नाही, पण नागपूर विद्यापीठाने अभ्यास न करता लागू केले. त्यानुसार विविध अभ्यासक्रमात मेजर विषय एकच ठेवला. सरकारने पटसंख्येच्या आधारावर पदभरतीस मंजूरी दिली आहे. मेजर विषयात विद्यार्थी संख्या असली तरी इतर विषयात पटसंख्या कमी झाली. ज्यामुळे नागपूर विभागात मंजूर पदांची संख्या कमी झाली. एनईपी लागू नसते तर विभागासाठी १००० च्यावर पदे मंजूर झाली असती, असा दावा अॅड. वाजपेयी यांनी केला

Ad 1
Tags: Shrikant Dhokte
Previous Post

गवंडगाव ग्रामस्थांकडून खासदार समीर भाऊ भुजबळ यांचा सत्कार; पाणीप्रश्न सुटल्याने समाधान

Next Post

अर्धापूर उपविभागीय कार्यालयात ‘प्रशासकीय इंजिनिअर’ गायब; कामांचा बोजवारा, नागरिक त्रस्त

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post

अर्धापूर उपविभागीय कार्यालयात 'प्रशासकीय इंजिनिअर' गायब; कामांचा बोजवारा, नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In