• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
वादळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान; पंचनामे करून तातडीने भरपाई द्या – शिवसेना (उबाठा)ची मागणी
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्याला अलीकडील वादळी पावसाचा मोठा तडाखा बसून शेकडो हेक्टरवरील केळी बागांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचा तातडीने पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आली असून यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेल्या केळी बागा मोठ्या प्रमाणावर मोडून पडल्या असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या पावसामुळे वीज पुरवठाही खंडित झाला होता.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

उटखेडा, कुसुंबा, भाटखेडा, निंभोरा, गहुखेडा, रणगाव, तासखेडा तसेच कोचूर, अटवडा, नेहेता, दोधे या गावांतील शेती शिवारात केळी व मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

हे निवेदन तहसीलदार दिपाली जेधे यांना देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद कोंडे, उपाध्यक्ष शाम भामरे, शेतकरी आघाडीचे सुरेश शिंदे, शहर उपप्रमुख संतोष महाजन, युवासेना शहर प्रमुख निलेश महाजन, शेख शाहरुख, शेख फारुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: Pramod K. Konde
Previous Post

ओम साई प्रतिष्ठानकडून मा. मंगेश चिवटे यांची सदिच्छा भेट; सामाजिक व आरोग्य उपक्रमांवर चर्चा

Next Post

लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
3
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
59
Next Post
लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

लाभक्षेत्रापासून वंचित भागाला मिळणार टेंभूचे पाणी; संग्रामसिंह देशमुख यांची अधिकाऱ्यांशी बैठक

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In