• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावरगाव ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
सावरगाव ते शेगाव पायदळ दिंडीला भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

सावरगाव (प्रतिनिधी : प्रदीप ताजने) : सावरगाव येथून ७ एप्रिल रोजी शेगावकडे निघालेल्या पायदळ दिंडी सोहळ्याने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले आहे. “गण गण गणात बोते”च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात दिंडीची वाटचाल उत्साहात सुरू असून सर्वत्र भक्तिरस ओसंडून वाहताना दिसत आहे.

या दिंडीत महिलांचा सहभाग विशेष ठळकपणे दिसून येत आहे. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, फुगड्या खेळत, अभंग गात आणि टाळांच्या तालावर महिलांनी वातावरण भारावून टाकले आहे. काही महिला आपल्या लहानग्यांसह दिंडीत सहभागी होत असून त्यांचा उत्साह, श्रद्धा आणि समर्पण भाविकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

राहेर येथील महाराजांच्या भजनसेवेने दिंडीला अधिक रंगत आली आहे. त्यांच्या भावस्पर्शी भजनांमधून अध्यात्म, सेवा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

या दिंडीचे आयोजन महादेव पायगन, मधुकर इंगळे, वामन राठोड, जानू बाबूसिंग राठोड, रमेश राठोड आणि बबन मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच मनोज पाटील, देविदास चोंडकर, वसुदेव पायघन, ज्ञानदेव पायघन, वामन बलक, गजानन पायघन, बाबुसिंग जाधव आदींच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा वाढली.

दिंडीचा संपूर्ण प्रवास शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून मार्गावर पिण्याचे पाणी, अल्पोपहार व विश्रांतीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. विविध ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून दिंडीचे उत्साहात स्वागतही केले जात आहे.

ही दिंडी धार्मिक परंपरेसोबतच समाजात श्रद्धा, सेवा आणि एकोप्याची भावना दृढ करण्याचे कार्य करत असून संगीता राठोड यांनी विशेष सहकार्य करत दिंडीला भेट देऊन सहभाग नोंदवला.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

अ‍ॅड. राम रघुवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात ‘जेवण टिफिन’चे वाटप

Next Post

देगलूर रोडवरील लॉजवर पोलिसांचा छापा; सहा पीडित महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

देगलूर रोडवरील लॉजवर पोलिसांचा छापा; सहा पीडित महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In