• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देव घरा आयला” नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
देव घरा आयला” नाटकाचा नाट्यप्रयोग रांजणपाडा उरण येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

कैलासराजे घरत
खारपाडा पेण
“
मरूआईच्या यात्रेनिमित्त कै.बाबीबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मरणार्थ
“अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ, रांजणपाडा उरण रजि. नवी मुंबई आयोजित,आगरी कोळी करडी समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे वास्तववादी आगरी भाषेतील दोन अंकी सामाजिक पुष्प “देव घरा आयला” या नाटकाचा प्रयोग रांजणपाडा गावातील हनुमान मंदिर येथे ०७ एप्रिल २०२६ रोजी रात्री ठीक दहा वाजता दणक्यात सादर झाला. या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत उपस्थित होते.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

त्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अर्पण करून, पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून जे.एन.पी.टी विश्वस्त रवींद्र पाटील साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रंगमंचावर सन्माननीय रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस मुरलीधरशेठ ठाकूर, जे.डी.शेठ बेलपाडा, धर्मुबाई पाटील माजी सरपंच जासई, बळीरामशेठ घरत(घरत फार्म स्टे),मिलिंद ठाकूर जासई, रमाकांत गावंड सर पिरकोन, धर्मादास घरत, मनीष नाईक, रमाकांत म्हात्रे रायगड जिल्हा भाजप कार्यकारिणी, पुरोगामी पत्रकार संघ उरण तालुका अध्यक्ष प्रवीण नाईक पेण तालुका सचिव रमाकांत घरत आदी मान्यवर उपस्थित होते. या नाटकाच्या कार्यक्रमाचे उत्तम निवेदक म्हणून जीवन डाकी-बोरखार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

गेली ३५ वर्षे “अष्टगंध सांस्कृतिक कला सामाजिक मंडळ, रांजणपाडा उरण, नाट्य कलेची सेवा करत आहे. या संस्थेने अनेक कलाकार घडविले. नवीन कलाकारांना हक्काचा रंगमंच देण्याचे काम ही संस्था करत आहे. या संस्थेतून बरेच कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर, सिरीयल, मूवी मध्ये गेले.अष्टगंध कलामंच ही संस्था विनोदी आगरी भाषेतील नाटके सादर करणारी प्रख्यात संस्था आहे. पिकलं पान हिरवा देठ, लग्ना आधी वरात, काका किश्याचा, रक्ताचा टिळा अशी सुरुवात करताना पुढे श्री.रंजन ठाकूर सर, श्री.हसुराम पाटील यांनी लिहिलेली नाटके चालू केली. विळखा, खळगी, पाषाण, हरिनामाने जलती पापे, बाबा लगीन अशी अनेक नाटके रंजन ठाकूर सर यांनी लिहिली. लफड्याच लग्न…पैशाने तुटली नाती..हे हसुराम पाटील यांचे ‘काळया दगडावरची पांढरी रेघ’ असे नाटक..नवीन दिग्गज कलाकार मिळून ही संस्था चालवताना दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रेक्षकांच्या आग्रहाने “देव घरा आयला” नाटक रंगमंचावर आणले. श्री.हसुराम त्रिंबक पाटील, खजिनदार प्रजोत हसुराम पाटील यांच्या प्रयत्नांनी श्री.अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली, निर्मिती प्रमुख रमेश चिंतामण कोळी, लेखक धनेश्वर म्हात्रे, दिग्दर्शक हसुराम पाटील, सहदिग्दर्शक प्रसाद कडू, सचीव दत्तात्रेय अनंत घरत, सल्लागार रंजन ठाकूर, नरेंद्र ठाकूर, पत्रकार कैलासराजे घरत, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे, बळीरामशेठ घरत, विद्याधर म्हात्रे, गजानन म्हात्रे यांच्या सल्ल्याने, ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा, रुद्र इंटरप्राइजेस, ड्रीम फाऊंडेशन, स्वराज मित्र मंडळ, जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा, यांच्या सहकार्याने “देव घरा आयला” नाटकाचा प्रयोग यशस्वी झाला. या नाटकात राजा-धनेश्वर म्हात्रे, शांत्या-कृष्णकांत म्हात्रे, मास्तर-हसुराम पाटील, भगत-दिगंबर कोळी, ज्ञानेश्वर-सुमित कुंभार, भग्याशेठ आणि इन्स्पेक्टर-अशोक म्हात्रे, दवंडीवाला व कार्यकर्ता-वैभव म्हात्रे, गुंड-प्रसाद कडू, अलंकार कडू, शांती-वैशाली मोहिते, परीशा सरोदे आणि बालकलाकार रुद्र ठाकूर यांनी आपल्या पात्राला योग्य तो न्याय देऊन उपस्थित नाट्य रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. नाटकाचे दर्जेदार सादरीकरण झाले.


नाट्य रसिक प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद होता. कलाकार दिगंबर कोळी बेलपाडा यांचा २७१ वा हा नाट्यप्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शक हसुराम पाटील(काकासाहेब)यांचा महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या नाटकात सर्वच कलाकार आणि बॅक स्टेज कलाकारांची मेहनत दिसून आली. संकल्पना-दिगंबर कोळी, मनोहर ठाकूर, नेपथ्य-राजा जोशी(दादर पेण), संगीत-आनंद कुबल(मुंबई), रंगभूषा-डी वाय म्हात्रे( खोपटे) ध्वनी संकल्पना- ध्रुवराज म्हात्रे कोप्रोली, रंगमंच व्यवस्था- संतोष साऊंड सर्व्हिस यांनी केली. एकंदर सर्वांनी “देव घरा आयला नाटकासाठी” बहुमूल्य कामगिरी केली. या नाटकाच्या माध्यमातून समाजातील भगत, बुवाबाजीमुळे पसरणारी अंधश्रद्धा, कर्ज काढून साजरे करण्यात येणारे सण उत्सव सावकारामुळे शेतकऱ्यांवरील
कर्जबाजारीपणा, बेरोजगारी आणि पद पैसा वाढल्यावर दारू, बारमध्ये जाऊन तरुणांमध्ये व्यसनाधिनता कशी वाढते, आपलीच माणसे आपले वैरी बनतात या सामाजिक परिस्थितीवर लक्ष वेधून अंजन घालण्याचे काम या नाटकातून केले आहे.

Tags: Kailas Gharat
Previous Post

भोकरदनमध्ये गॅस सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा; ऑनलाईन बुकिंगमुळे नागरिक त्रस्त

Next Post

कुंडलवाडी लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
3
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
2
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
58
Next Post
कुंडलवाडी लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची निवड

कुंडलवाडी लघुउद्योग संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांची निवड

ताज्या बातम्या

कुणबी समाजोन्नती संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार; करिअर मार्गदर्शन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026

भडगावात भाजपा महिला मोर्चाची संघटनात्मक बैठक उत्साहात संपन्न

August 23, 2026

जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या गणेशोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब इंदुरे; उपाध्यक्षपदी राजकुमार घाडगे

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In