• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सेलूच्या इंजिनिअरचे नागपुरात अवयवदान; पाच जणांना नवे आयुष्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
37
VIEWS
Ad 1


तालुका प्रतिनिधी सेलू…
शंकर पानबुडे
येथील तरुण अभियंता अतुल देवळे (वय ४७) यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे पाच जणांना नवे आयुष्य मिळाले. या घटनेमुळे दु:खाच्या काळातही मानवतेचा आदर्श निर्माण झाला आहे.

RelatedPosts

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक


मिळालेल्या माहितीनुसार, अतुल देवळे हे ४ एप्रिल रोजी मित्रांसोबत दुचाकीने जात असताना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र उपचारादरम्यान त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यात आले.
या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा निर्णय घेत अवयवदानास संमती दिली. यानंतर यकृत, दोन्ही किडनी आणि दोन्ही नेत्र (डोळे) दान करण्यात आले.


वैद्यकीय समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये एका ५४ वर्षीय रुग्णाला यकृत, दोन वेगवेगळ्या रुग्णांना किडनी तर दोन जणांना नेत्रदानाद्वारे दृष्टी मिळाली.
अतुल यांच्या पश्चात पत्नी रजनी, दोन मुली अशी कुटुंबीय आहेत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
२०१३ पासून नागपूर विभागात हे १९३ वे अवयवदान असून, अशा प्रकारच्या निर्णयामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत. अतुल देवळे यांच्या अवयवदानामुळे त्यांचे आयुष्य जरी थांबले असले तरी त्यांच्या अवयवांच्या माध्यमातून ते पाच जणांच्या रूपाने जिवंत राहणार आहेत.

Tags: Shankar Panbude
Previous Post

पालघरमधील विराज प्रकल्प जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थ आक्रमक

Next Post

कन्नड येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला नवसंजीवनी

Related Posts

ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
7
ताज्या घडामोडी

शासकीय काम करताना कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा राजपूत एकता मंचतर्फे तीव्र निषेध

August 23, 2026
4
ताज्या घडामोडी

केंद्रीय हिंदी संस्थानच्या नवीकरण अभ्यासक्रमात चेतन जाधव यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिरात ७१६ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 23, 2026
6
ताज्या घडामोडी

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

August 23, 2026
5
ताज्या घडामोडी

दर्यापुरात भरला रानभाज्यांचा मेळा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
67
Next Post

कन्नड येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला नवसंजीवनी

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In