• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जेजुरीत ‘बहुजन परिवार संवाद मेळावा २०२६’चे आयोजन; सामाजिक एकतेचा संदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
जेजुरीत ‘बहुजन परिवार संवाद मेळावा २०२६’चे आयोजन; सामाजिक एकतेचा संदेश
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी : महाराष्ट्रातील बहुजन समाजाला सामाजिक व राजकीय स्तरावर एकत्र आणण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने जेजुरी येथे ‘बहुजन परिवार संवाद मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी मल्हार नाट्यगृह, जेजुरी येथे पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपीचंद पडळकर राहणार आहेत.

बहुजन समाजाला आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्रित लढा उभारणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः इतर मागास व भटक्या-विमुक्त प्रवर्गातील समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर चर्चा करून ठोस भूमिका घेण्यात येणार आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

या मेळाव्यात जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांना विधान परिषदेत संधी देण्याबाबत ठराव मांडण्यात येणार असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोहित खोमणे, तर निमंत्रक म्हणून अंकुश जाधव कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून हजारो बहुजन समाज बांधव या मेळाव्यात सहभागी होणार असून विविध समाजघटक पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहणार आहेत.

मेळाव्याची सुरुवात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला अभिषेक करून रॅलीने होणार आहे. ही रॅली नंदी चौक, मुख्य चौक मार्गे मल्हार नाट्यगृह येथे दाखल होईल. त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा होऊन बहुजन समाजाच्या हक्कांसाठी एकजूट करण्याचा संदेश दिला जाणार आहे.

तसेच कार्यक्रमादरम्यान मल्हारी मार्तंडाच्या चरणी समाजाच्या मागण्यांचे साकडे घालण्यात येणार असून अखेरीस महाराष्ट्र गीताने समारंभाची सांगता होणार आहे.

Ad 1
Tags: Amol Madne
Previous Post

गरजू महिलेसाठी मदतीचा हात; धनश्रीताई बिचेवार यांची निस्वार्थ सेवा

Next Post

ताडपिंपळगाव व देवगाव रंगारी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
ताडपिंपळगाव व देवगाव रंगारी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

ताडपिंपळगाव व देवगाव रंगारी येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In