• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दापोलीत भक्तीचा महासागर उसळणार! आंबवलीत आई काळेश्वरी देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा व जिर्णोद्धार सोहळ्याची भव्य तयारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1
Ad 1

🟠 २२ ते २४ एप्रिल दरम्यान धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; ना. योगेशदादा कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती निश्चित
दापोली (प्रतिनिधी:राकेश.चिलबे)
कोकणातील हिरव्यागार डोंगररांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि शांत वातावरणाच्या कुशीत वसलेले दापोली तालुक्यातील आंबवली बुद्रुक हे गाव लवकरच भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाच्या रंगांनी उजळून निघणार आहे. ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवी मंदिराचा जिर्णोद्धार आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २२ ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत अत्यंत भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून, या सोहळ्याकडे संपूर्ण कोकणासह राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

आंबवली सांस्कृतिक सेवा मंडळ (रजि.) तसेच समस्त ग्रामस्थ (ग्रामीण व मुंबई मंडळ) यांच्या संयुक्त पुढाकारातून साकारलेला हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, गावाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा आणि परंपरेच्या जतनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. डोंगरांच्या कुशीत नव्याने उभारलेले मंदिर हे आंबवलीच्या अस्मितेचे आणि श्रद्धेचे भव्य प्रतीक म्हणून उभे राहिले आहे.
सोहळ्याची सुरुवात बुधवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पारंपरिक धार्मिक विधींनी होणार आहे. सकाळी ११ वाजता मंदिर उद्घाटनाचा मुख्य सोहळा संपन्न होईल. त्यानंतर काढण्यात येणारी देवीची भव्य मिरवणूक गावातील प्रत्येक रस्त्यावरून जात भक्तीमय वातावरण निर्माण करणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या दिवशी स्थानिक कलाकारांच्या सहभागातून सांस्कृतिक कार्यक्रम व भजन संध्या रंगणार आहे. दि. २३ एप्रिल हा सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी ९ वाजता मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. सायंकाळी महाआरतीनंतर रात्री ‘बुवा-जहांगीर (आतगाव)’ यांचा भजनाचा सामना भक्तांना अध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणार आहे.

सोहळ्याच्या सांगता दिनी म्हणजेच दि. २४ एप्रिल रोजी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात काकड आरती, मान्यवरांचा सत्कार आणि महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री ‘अस्तित्व महाराष्ट्राचं’ प्रस्तुत ‘रामायण’ हे भव्य महानाट्य सादर होणार असून सोहळ्याची सांगता दिमाखात होणार आहे.
भाविकांसाठी विशेष आकर्षण म्हणून शुक्रवार दि. २४ एप्रिल रोजी दुपारी व रात्री अशा दोन सत्रांमध्ये महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला असून, हजारो भाविक या प्रसादाचा लाभ घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या भव्य सोहळ्यासाठी राज्याचे राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभणार आहे. तसेच विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकणातील निसर्गरम्य डोंगरदऱ्यांच्या साक्षीने उभा राहणारा हा सोहळा परंपरा, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरणार आहे. पुढील पिढीपर्यंत आपली संस्कृती आणि आध्यात्मिक वारसा पोहोचवण्याच्या उद्देशाने आंबवलीकरांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी मानला जात आहे. या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्थळ: मु. आंबवली बुद्रुक, पो. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी.

Ad 1
Tags: Rakesh Chilabe
Previous Post

रिसोड येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नक्षत्रवाडी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीकडून उपमहापौरांना निवेदन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

नक्षत्रवाडी अण्णाभाऊ साठे उत्सव समितीकडून उपमहापौरांना निवेदन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In