• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
चंदगडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

चंदगड (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात. चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,” अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

रामपूर येथे आयोजित नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील होते.

RelatedPosts

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

‘चंदगडी पॅटर्न’ची दखल
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने मोठ्या विश्वासाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून दिले असून, ‘चंदगडी पॅटर्न’मुळे परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. हा विश्वास कायम ठेवण्याचे काम पक्ष करेल, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी नूतन सभापती विलास नाईक यांनी तालुक्यातील रिक्त पदे तातडीने भरून विकासकामांना गती देण्याची मागणी केली.

शक्तिपीठ महामार्गावर टीका
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार राजेश पाटील यांनी नूतन प्रतिनिधींना जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्याचा सल्ला दिला. तसेच ‘शक्तिपीठ महामार्ग’ प्रकल्पावर टीका करत हा प्रकल्प परिसराच्या निसर्गासाठी घातक ठरू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकरी आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब आसुर्लेकर, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम कुपेकर, सुधीर देसाई, अमर चव्हाण, गडहिंग्लज सभापती प्रतिभा चव्हाण, सुखदेव शहापूरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र शिवणगेकर यांनी केले.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

आजरा हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा; कुमारी वेदिका पोतदारची ‘इस्त्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

Next Post

शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

Related Posts

ताज्या घडामोडी

बेकायदेशीर मुरूम उत्खननामुळे पाझर तलावाला धोका; तात्काळ कारवाईची मागणी

July 14, 2026
9
वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी
ताज्या घडामोडी

वादळी पावसाचा कुडणला तडाखा; केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान, मदतीची शेतकऱ्यांची मागणी

July 14, 2026
4
ताज्या घडामोडी

नंदुरबारमध्ये जिल्हा दिव्यांग समितीची बैठक; विविध कल्याणकारी योजना व कृती आराखड्यास मंजुरी

July 14, 2026
1
ताज्या घडामोडी

लोणी येथे महिला शेतकऱ्यांनी घेतले नैसर्गिक शेतीचे धडे; जीवामृत, दशपर्णी अर्क प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 14, 2026
1
ताज्या घडामोडी

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पाथरी बसस्थानकात वृक्षारोपण; ‘७८ हजार वृक्ष’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

July 14, 2026
2
ताज्या घडामोडी

साने गुरुजी विद्यालय, कुरुंदवाड येथे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; विद्यार्थ्यांना दिले सुरक्षेचे धडे

July 14, 2026
30
Next Post
शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

शिक्षकांच्या थकीत पगारासाठी २० एप्रिलला निर्णायक बैठक; आमदार जयंत आसगावकर यांची माहिती

ताज्या बातम्या

दिघोळमध्ये श्री संत एकनाथ महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत; वारकऱ्यांसाठी महाप्रसाद व नाश्त्याची व्यवस्था

July 14, 2026
पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

पाठपुराव्याला यश; वाठार–सोळशी व वाठार–भावेनगर एसटी सेवा पुन्हा सुरू

July 14, 2026

श्री घुमाई देवी उपसा सिंचन योजनेची मागणी; वाहून जाणारे पाणी अडवून पिंपोडे बुद्रुकला दिलासा देण्याचा प्रस्ताव

July 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In